शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कमजोर बचावामुळे ‘पलटन’ तळाला

By admin | Updated: August 16, 2014 00:04 IST

प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या सत्रात पुणेरी पलटन संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती.

अमोल मचाले, पुणेप्रो कबड्डी लीगच्या पहिल्या सत्रात पुणेरी पलटन संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, सुमार कामगिरीमुळे हा संघ सध्या तळाला फेकला गेला आहे. बचावाच्या क्षेत्रात कमजोर ठरल्यामुळे पुणेरी पलटन संघ अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याची कबुली संघाचा कर्णधार वजीरसिंग आणि प्रशिक्षक रामफल वजीर यांनी दिली.जयपूर पिंक पँथर्स संघाविरुद्धच्या लढतीपूर्वी ‘लोकमत’सोबत संवाद साधताना वजीर म्हणाला, ‘‘पुण्यातील पाठीराख्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आम्ही अपयशी ठरलोय, याची जाणीव आहे. बचावात कमजोर पडल्यामुळे काही सामन्यांत महत्त्वाच्या क्षणी आम्हाला नुकसान पत्करावे लागले. या खेळात आक्रमणासोबतच बचावदेखील महत्त्वाचा ठरतो. अव्वल स्थानावरील यू मुंबासह इतर संघांकडे चांगले बचावपटू आहेत. इतर संघ आणि आमच्या संघातील कामगिरीमध्ये याचमुळे फरक पडलाय.’’ वजीरसिंग हा ‘वन मॅन आर्मी’प्रमाणे एकटाच झुंजतोय. मात्र त्याला इतर खेळाडूंकडून पहिजे तशी साथ लाभू शकलेली नाही. हे मान्य करतानाच आपल्या सहकाऱ्यांना सांभाळून घेत तो म्हणाला, ‘‘इतर खेळाडू आपल्या परीने प्रयत्न करताहेत. मात्र, ते पुरेसे नाहीत. आव्हान कायम राखण्यासाठी आता आम्हाला यापुढील प्रत्येक लढत जिंकणे अनिवार्य झाले आहे. संघातील सर्व खेळाडूंना याची जाणीव आहे. प्रत्येक लढत महत्त्वाची असल्याने आम्ही उर्वरित लढतींत सर्वस्व पणाला लावून खेळ करू.’’