शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पायरेट्सचा रोमांचक विजय

By admin | Updated: August 15, 2015 02:01 IST

अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात यजमान बंगळुरू बुल्सने आक्रमक खेळाच्या जोरावर दिल्लीची ‘दबंगगिरी’ ४०-२१ अशी तब्बल १९ गुणांनी उतरवली. या धमाकेदार विजयासह बंगळुरूने

बंगळुरु : अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात यजमान बंगळुरू बुल्सने आक्रमक खेळाच्या जोरावर दिल्लीची ‘दबंगगिरी’ ४०-२१ अशी तब्बल १९ गुणांनी उतरवली. या धमाकेदार विजयासह बंगळुरूने गुणतालिकेत ३८ गुणांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर दबंग दिल्ली संघ २६ गुणांसह सहाव्या स्थानी कायम आहे. तत्पूर्वी झालेल्या चुरशीच्या सामन्यात पटणा पायरेट्सने निसटता विजय मिळवताना बंगाल वॉरियर्सला ३४-३२ असे नमवले.यजमान बंगळुरुने दिल्लीकरांना सामन्यात एकही संधी दिली नाही. आक्रमण व भक्कम बचावाच्या जोरावर बंगळुरुने मध्यंतरालाच २१-८ अशी १३ गुणांची एकतर्फी आघाडी घेत सामन्याचे चित्र स्पष्ट केले. यानंतर काही प्रमाणात दिल्लीने पुनरागमनाचे प्रयत्न केले खरे, मात्र बंगळुरुचा वेगवान खेळ व मोठ्या पिछाडीचे असलेले दडपण यामुळे दिल्लीकरांनी शरणागती पत्करली. धरमराज चेरालथनचा निर्णायक अष्टपैलू खेळ व अजय ठाकूर, राजेश मोंडल यांच्या आक्रमक चढाईच्या जोरावर यजमानांनी बाजी मारली. दिल्लीकडून काशिलिंग आडके, कर्णधार रवींदर पहल यांची झुंज अपयशी ठरली. तत्पूर्वी पटणा पायरेट्सला विश्रांतीनंतर बंगालकडून कडवी झुंज मिळाली. एकवेळ सामना बंगालच्या बाजूने झुकणार, असे चिन्हे दिसत असतानाच पायरेट्सने जोरदार मुसंडी मारत सामन्यावरील पकड सोडली नाही. गुरविंदर सिंगच्या आक्रमक चढाई आणि डी. सुरेश कुमार, गिरीश एरनाक यांच्या भक्कम पकडीच्या जोरावर पायरेट्स संघाने मध्यंतराला १८-१२ असे वर्चस्व राखले होते.(वृत्तसंस्था)