शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पेनल्टी कॉर्नरवर मेहनत घ्यावी लागेल

By admin | Updated: June 16, 2015 02:04 IST

भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नरवर विशेष मेहनत घ्यावी लागेल, असे मत एफआयएच विश्व हॉकी लीगच्या सेमीफायनलपूर्वी

एंटवर्प : भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नरवर विशेष मेहनत घ्यावी लागेल, असे मत एफआयएच विश्व हॉकी लीगच्या सेमीफायनलपूर्वी झालेल्या सराव सामन्यांनंतर भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक पॉल वान ऐस यांनी व्यक्त केले. भारताला रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात बेल्जियमविरुद्ध २-१ ने पराभव स्वीकारावा लागला. सरदारसिंंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या सराव सामन्यात फ्रान्सचा १-० ने पराभव केला होता. विश्व हॉकी लीगच्या सेमीफायनलमध्ये भारताला सलामी लढतीत २० जून रोजी फ्रान्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या गटात पाकिस्तान, आॅस्ट्रेलिया व पोलंड या संघांचाही समावेश आहे.वान ऐस म्हणाले, ‘‘सराव सामन्यांत आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले. आम्ही फ्रान्सचा पराभव केला, तर बेल्जियमविरुद्ध थोड्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. दोन सराव सामन्यांतील कामगिरीचा विचार करताना सुरुवातीपासून प्रतिस्पर्धी संघावर दडपण निर्माण करणे आवश्यक असल्याचे दिसून येते. डीमध्ये संधीचा शोध घेण्यापेक्षा पेनल्टी कॉर्नर मिळविण्यावर मेहनत घ्यावी लागेल. आमच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघाची बचाव फळी भेदण्यात यश मिळवले; पण गोल नोंदवणेही आवश्यक आहे. सुरुवातीलाच गोल नोंदवला तर प्रतिस्पर्धी संघावर दडपण येते.’’बचावाबाबत वान ऐस म्हणाले, ‘‘दोन्ही सामन्यांमध्ये बचाव चांगला होता. आम्हाला बेल्जियमविरुद्ध २ गोल स्वीकारावे लागले असले, तरी बचाव फळीची कामगिरी उल्लेखनीय ठरली.’’दरम्यान, महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक मथियास अहरेंस म्हणाले, ‘‘सलामी लढतीत यजमान बेल्जियमला गृहमैदानावर खेळण्याचा लाभ मिळेल. उभय संघ तुल्यबळ असून, सुरुवातीला दडपण निर्माण करणे आवश्यक आहे. आमची आघाडीची फळी चांगली असून मला शानदार सुरुवातीचा विश्वास आहे. संघाने प्रतिस्पर्धी संघाच्या सर्कलमध्ये चेंडूवर नियंत्रण राखण्याचे महत्त्व ओळखले असून, शॉर्ट पासेसवर लक्ष केंद्रित केले आहे.’’ (वृत्तसंस्था)