दंड
By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST
सॅमी व मुनी यांना दंडनेल्सन : वेस्ट इंडिजचा फलंदाज डॅरेन सॅमी व आयर्लंडचा गोलंदाज जॉन मुनी यांना विश्वकप स्पर्धेत सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीदरम्यान वेगवेगळ्या घटनांमध्ये अश्लील भाषेचा वापर केल्या प्रकरणी दंड ठोठावण्यात आला. त्यांना मिळणार्या सामना शुल्कातील तीस टक्के रकमेची दंड म्हणून कपात करण्यात येईल.आयसीसीने स्पष्ट केले, 'डॅरेन सॅमी व ...
दंड
सॅमी व मुनी यांना दंडनेल्सन : वेस्ट इंडिजचा फलंदाज डॅरेन सॅमी व आयर्लंडचा गोलंदाज जॉन मुनी यांना विश्वकप स्पर्धेत सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीदरम्यान वेगवेगळ्या घटनांमध्ये अश्लील भाषेचा वापर केल्या प्रकरणी दंड ठोठावण्यात आला. त्यांना मिळणार्या सामना शुल्कातील तीस टक्के रकमेची दंड म्हणून कपात करण्यात येईल.आयसीसीने स्पष्ट केले, 'डॅरेन सॅमी व जॉन मुनी यांच्यावर खेळाडू व सपोर्ट स्टाफबाबत असलेल्या आचारसंहितेच्या कलम २.१.४ चे उल्लंघन केल्या प्रकरणी दंड ठोठावण्यात आला.'या दोन्ही घटना वेस्ट इंडिज संघाच्या डावादरम्यान घडल्या. पहिल्या घटनेत ३४ व्या षटकादरम्यान फटका खेळल्यानंतर टीव्ही स्क्रिनवर सॅमीने आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचे स्पष्ट झाले. दुसरी घटना ४५ व्या षटकादरम्यान घडली. ज्या वेळी क्षेत्ररक्षकाने झेल सोडला त्या वेळी मुनीने अपशब्द वापरले. मॅच रेफरी ख्रिस ब्रॉड यांनी या प्रकरणी दंड ठोठावला. दोन्ही खेळाडूंनी गुन्हा मान्य केल्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज भासली नाही. (वृत्तसंस्था) ०००००