शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भारतावर बहिष्काराची पीसीबीची धमकी

By admin | Updated: September 26, 2015 00:09 IST

डिसेंबर महिन्यात प्रस्तावित द्विपक्षीय क्रिकेट मालिकेसाठी भारतातर्फे हिरवा कंदिल मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष (पीसीबी) शहरयार खान यांनी

कराची : डिसेंबर महिन्यात प्रस्तावित द्विपक्षीय क्रिकेट मालिकेसाठी भारतातर्फे हिरवा कंदिल मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष (पीसीबी) शहरयार खान यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि आशियाई क्रिकेट स्पर्धांमध्ये भारतावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. स्थानिक मीडियाला दिलेल्या मुलाखतीत शहरयार म्हणाले, ‘डिसेंबरमध्ये होणाऱ्या प्रस्तावित मालिकेबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, पण बीसीसीआयने मालिका खेळण्यास नकार दिला तर आयसीसी व एसीसी सामन्यांमध्ये त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याशिवाय आमच्याकडे कुठला पर्याय शिल्लक राहणार नाही.’भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार उभय संघांदरम्यान डिसेंबरमध्ये मालिकेचे आयोजन होणार होते, पण अद्याप याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून सीमेवर पाकिस्तानतर्फे शस्त्रबंदी कराराचे उल्लंघन आणि पंजाबमधील गुरदासपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे उभय देशांदरम्यानच्या संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी अलिकडेच दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र शक्य नसल्याचे वक्तव्य केले होते. द्विपक्षीय क्रिकेट मालिकेसाठी सातत्याने प्रयत्न केल्यानंतर अपयशी ठरलेले शहरयार यांना याबाबत कडक भूमिका स्वीकारण्याचे जाहीर करताना म्हटले आहे की,‘गेल्या महिन्यात २८ आॅगस्ट रोजी बीसीसीआयला एक पत्र पाठविण्यात आले होते, पण त्याचे उत्तर अद्याप मला मिळालेले नाही. बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यांनी मालिका खेळण्यास नकार दिला तर आम्हाला पुढील कारवाईसाठी विचार करता येईल. बीसीसीआयकडून उत्तर मिळाल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल.’ (वृत्तसंस्था)-------पंजाबमधील गुरदासपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे उभय देशांदरम्यानच्या संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी अलिकडेच दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र शक्य नसल्याचे वक्तव्य केले होते. ------दोन दिवसांपूर्वी शहरयार यांनी कडक भूमिका घेताना मालिकेसाठी भारताची मनधरणी करणार नसल्याचे स्पष्ट केले. आता चेंडू बीसीसीआयच्या कोर्टात असून शेजारी राष्ट्र याबाबत निर्णय घेईल, असे शहरयार यांनी म्हटले होते. २०१२ मध्ये पाकिस्तानने भारत दौऱ्यात वन-डे मालिका खेळली होती, पण त्यानंतर आशियातील या दोन दिग्गज संघांदरम्यान मालिका खेळल्या गेली नाही. अष्टपैलू शाहिद आफ्रिदी, माजी खेळाडू जावेद मियांदादसह अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी मालिकेसाठी भारताची मनधरणी करण्याच्या पीसीबीच्या भूमिकेवर टीका केली आहे. -----------भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान नेहमी तणावपूर्ण संबंध राहिलेले आहे, पण आम्ही क्रिकेट खेळलो आहे. २००७ नंतर भारताने आमच्याविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळलेले नाही. आता आम्ही भारताकडे द्विपक्षीय क्रिकेट संबंध सुधारण्यासाठी गळ घालणार नाही. यासाठी त्यांना सकारात्मक भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी पुढाकार घ्यावा.- शहरयार, पीसीबीचे प्रमुख