शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पीबीएलमध्ये महिला दुहेरीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: December 17, 2015 01:30 IST

एकेकाळी भारताच्या अव्वल दुहेरी महिला खेळाडू ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पा यांनी भारतात दुहेरी खेळाडूंना जास्त महत्त्व दिले जात नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

नवी दिल्ली : एकेकाळी भारताच्या अव्वल दुहेरी महिला खेळाडू ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पा यांनी भारतात दुहेरी खेळाडूंना जास्त महत्त्व दिले जात नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. मात्र, आता भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या (बाई) वतीने होणाऱ्या प्रीमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) स्पर्धेत ही बाब सिद्ध झाली आहे.‘बाई’ने पूर्वीच्या इंडियन बॅडमिंटन लीगच्या (आयबीएल) आयोजित केलेल्या पीबीएल स्पर्धेचे स्वरूप निश्चित केले असून, यामध्ये दोन पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी आणि मिश्र दुहेरी अशा लढतींचा समावेश आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे यामध्ये महिला दुहेरीचा समावेश नसून महिला खेळाडूंना कमी संधी आहे. त्यामुळेच एकूण स्पर्धेचे स्वरूप पाहताना पुरुष खेळाडूंचे वर्चस्व राहण्याची स्पष्ट चित्रे आहेत. जागतिक अजिंक्यपद कांस्यपदक विजेती आणि २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेची विजेती जोडी ज्वाला - आश्विनी यांनी सातत्याने महिला दुहेरी खेळाडूंकडे दुर्लक्ष होत असल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. एकेरी खेळाडूंच्या तुलनेत दुहेरी खेळाडूंना सुविधा कमी मिळतात, यावर त्यांचा अधिक भार होता. विशेष म्हणजे रिओ आॅलिम्पिकसाठी या दोन्ही अव्वल खेळाडूंचा केंद्र सरकारच्या ‘टॉप’ योजनेतही काहीसा उशिरा समावेश करण्यात आला होता. त्याच वेळी जागतिक क्रमवारीत त्यांच्याहून पिछाडीवर असलेल्या एकेरी खेळाडूंचा मात्र लवकर समावेश करण्यात आला होता.२ ते १७ जानेवारीदरम्यान आयोजन होणाऱ्या पीबीएलचे नवे स्वरूप मंगळवारी निश्चित करण्यात आले. स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात पाच लढती होणार असून, यामध्ये पुरुषांना दोन एकेरी व एक दुहेरी व मिश्र दुहेरी लढत खेळण्याची संधी असेल, तर महिलांना मात्र एकेरी व मिश्र दुहेरी लढत खेळण्यास मिळेल. (वृत्तसंस्था) नव्या वादाला जन्म...जगभरात खेळल्या जाणाऱ्या सर्वच स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरी व दुहेरी, तसेच मिश्र दुहेरी अशा पाच लढती खेळविल्या जातात. पीबीएल स्पर्धेत जगभरातील अव्वल खेळाडू खेळणार आहेत. मात्र, तरीही ‘बाई’ने महिला दुहेरी गटाला वगळून विनाकारण वाद ओढावून घेतला आहे.