शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

पवारांनी माघार घ्यावी

By admin | Updated: June 13, 2015 01:41 IST

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या प्रतिष्ठेच्या मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ची निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. एमसीए अध्यक्षपदासाठी थेट विद्यमान

मुंबई : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या प्रतिष्ठेच्या मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ची निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. एमसीए अध्यक्षपदासाठी थेट विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुद्ध निवडणुकीत उभे राहिलेले ‘क्रिकेट फर्स्ट’ गटाचे प्रमुख डॉ. विजय पाटील यांनी पवार यांना निवडणुकीतून माघार घेण्याचा आग्रह केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबई क्रिकेटवर कायमच वर्चस्व राहिले आहे. एमसीएचे विद्यमान उपाध्यक्ष असलेले पाटील यांनी यंदा थेट अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज करताना थेट पवार यांच्यासमोर आव्हान उभे केल्याने यंदाची निवडणूक चांगलीच अटीतटीची झाली आहे. याविषयी पाटील म्हणाले की, मी शरद पवार यांचा अत्यंत सम्मान करतो. त्यांनी राजकीय व सार्वजनिक पातळीवर खूप मोठ्या पदावर राहून कार्य केले असून, त्यांचा अनुभव दांडगा आहे. मात्र या वेळी त्यांनी क्रिकेट फर्स्ट गटाला शुभेच्छा देऊन आशीर्वाद द्यावा. तसेच, मी जरी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला असला तरी, मी पवार यांच्या विरोधात नसून एमसीएच्या प्रशासनाविरुद्ध लढत आहे. या प्रशासनामध्ये अनेक बदल करण्यासाठी मी निवडणूक लढवत असल्याचेदेखील पाटील यांनी सांगितले.दरम्यान, क्रिकेट फर्स्ट गटातून पाटील यांच्याव्यतिरिक्त लालचंद राजपूत, प्रवीण आमरे आणि अ‍ॅबी कुरविल्ला यांसारख्या माजी क्रिकेटपटूंसह माजी रणजी फिरकीपटू संजय पाटील हे एमसीएच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.पवार यांच्याच पवार - म्हाडदळकर गटाच्या रवी सावंत व आशिष शेलार यांनीदेखील अध्यक्षपदासाठी अर्ज केल्याने वेगळीच रंगत निर्माण झाली होती. मात्र सत्ताधारी म्हाडदळकर गटाने हे दोन्ही अर्ज केवळ डमी असल्याचे सांगितल्याने अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे १३ जूनला सावंत व शेलार आपआपला अर्ज मागे घेतील हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता १७ जूनला होणाऱ्या अध्यक्षपदासाठी पवार वि. पाटील अशी थेट लढत होईल हे स्पष्ट आहे. (क्रीडा प्रतिनिधी)