शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पाटील स्टेडियम विश्वचषकासाठी सज्ज

By admin | Updated: March 26, 2017 00:50 IST

फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळाडूंसाठी आवश्यक सर्व सुविधांची पूर्तता नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील

मुंबई : फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळाडूंसाठी आवश्यक सर्व सुविधांची पूर्तता नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील स्टेडियमवर करण्यात आली आहे. देशातील दर्जेदार स्टेडियमपैकी पाटील स्टेडियम हे एक असून विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज असल्याचा विश्वास फिफा स्पर्धाप्रमुख जैमे यार्जा यांनी व्यक्त केला.फिफाच्या शिष्टमंडळाने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमची शनिवारी पाहणी केली, त्या वेळी जैमे यार्जा बोलत होते. या प्रसंगी फिफा स्पर्धा संचालक झेविअर सेप्पी, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सीईओ हेन्री मेनेझेझ, स्टेडिअमचे अध्यक्ष विजय पाटील, नवी मुंबईचे अतिरिक्त महापालिका आयुक्त अंकुश चव्हाण आदी उपस्थित होते. खेळाडूंसाठी नव्याने तयार करण्यात आलेले ड्रेसिंग रूम, प्रेक्षक आसनव्यवस्था, सामना संपल्यानंतर प्रेक्षकांना बाहेर पडण्याची व्यवस्था या बाबींची फिफा शिष्टमंडळाने पाहणी केली. या वेळी यार्जा म्हणाले, की पाटील स्टेडियमला यंदाची ही चौथी भेट असून स्टेडियम पाहून मी आनंदी आहे. या स्टेडियमसारखा दर्जा अन्य स्टेडियमने राखणे गरजेचे आहे. शिवाय, विश्वचषकासाठी येणाऱ्या संघांसाठी ४ ट्रेनिंग मैदानाची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. या विश्वचषकामुळे भारतीय फुटबॉलचा चेहरा बदलेल, अशी आशा यार्जा यांनी व्यक्त केली. (क्रीडा प्रतिनिधी)