शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
4
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
7
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
8
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
9
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
10
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
11
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
12
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
13
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
15
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
16
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
17
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
18
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
19
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
20
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता

थेट प्रवेशासाठी पाकिस्तानचे प्रयत्न

By admin | Updated: January 12, 2017 01:19 IST

वन डे क्रमवारीत तळाच्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानला फॉर्ममध्ये असलेल्या विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाविरुद्ध

दुबई : वन डे क्रमवारीत तळाच्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानला फॉर्ममध्ये असलेल्या विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन येथे शुक्रवारपासून पाच सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेत यश मिळवत, २०१९ च्या विश्वचषकात थेट प्रवेशासाठी पाक संघ धडपडणार आहे.माजी विश्वविजेत्या पाकला इंग्लंडमध्ये आयोजित ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळविण्यासाठी झुंजावे लागत आहे. संघ सध्या ८९ गुणांसह आठव्या स्थानावर आहे. बांगलादेशपेक्षा दोन गुण कमी तर विंडिजपेक्षा दोन गुण अधिक आहेत. यजमान इंग्लंडशिवाय ३० सप्टेंबर २०१७ रोजी आयसीसी वन डे क्रमवारीत पहिल्या सात स्थानांवर राहणाऱ्या संघांना जुलै २०१९ मध्ये आयोजित विश्वचषकात थेट प्रवेश दिला जाईल. तळाच्या स्थानावर राहणारे चार संघ, तसेच आयसीसी विश्व क्रिकेट लीगमधील सहा असे एकूण दहा संघ आयसीसी विश्व क्वालिफायर २०१८ मध्ये खेळतील. पाकला आपली रँकिंग कायम ठेवण्यासाठी मालिकेतील किमान एक सामना जिंकणे अनिवार्य आहे. पाकने दोन सामने जिंकल्यास बांगलादेशच्या बरोबरीने त्यांचे ९१ गुण होतील, तरीही दशांशच्या तुलनेत पाक मागेच राहील. पाकने मालिका जिंकल्यास बांगलादेश मागे पडेल. दुसरीकडे आॅस्ट्रेलियाला स्थान कायम राखायचे झाल्यास मालिका किमान ४-१ ने जिंकणे गरजेचे असेल. मालिका ३-२ ने जिंकली, तरीही त्यांच्यावर गुण गमविण्याची पाळी येईल. पाकने ४-१ ने मालिका जिंकल्यास आॅस्ट्रेलियाला अव्वल स्थान गमवावे लागेल. तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारताला दुसऱ्या स्थानावरील द. आफ्रिकेला मागे टाकण्यासाठी इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकण्याचे आव्हान असेल.खेळाडूंबाबत बोलायचे झाल्यास, भारतीय कर्णधार विराट कोहलीची नजर अव्वल स्थानावर असलेला आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स याच्या अव्वल स्थानावर असेल. विराट डिव्हिलियर्सच्या तुलनेत १३ धावांनी मागे आहे. (वृत्तसंस्था)