शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धोनीच्या कडेवर पाकिस्तानी खेळाडूचं बाळ

By admin | Updated: June 18, 2017 12:00 IST

अंतिम लढतीत कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीमुळे मैदानाबाहेर वातावरण चांगलेच तापले असताना खेळाडूंमध्ये मात्र खेळीमेळीचे वातावरण दिसत आहे.

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 18 -  भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीसाठी दोन्ही कडच्या खेळाडूंनी जय्यत तयारी केली आहे. कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीमुळे मैदानाबाहेर वातावरण चांगलेच तापले असताना खेळाडूंमध्ये मात्र खेळीमेळीचे वातावरण दिसत आहे. त्याचाच प्रत्यय काल लंडनमधील एका हॉटेलमध्ये आला. 
काल भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमदच्या कुटुंबाची भेट झाली. यावेळी धोनीने सर्फराझचा मुलगा अब्दुल्ला याला चक्क कडेवर उचलून घेतले. सर्फराझ याचा मुलगा अब्दुल्ला याचा जन्म या वर्षी फेब्रुवारी महिन्यात झाला होता. धोनी आणि पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ याच्या मुलाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच त्यावर क्रिकेटप्रेमींकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.  
( भारत-पाकिस्तान महायुद्ध! विराटसेना सज्ज )
 
आज होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत भारतीय संघ जेतेपद राखण्यासाठी ओव्हलच्या मैदानात उतरेल. त्यात अंतिम लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा संघ समोर असल्याने सामन्याला अधिकच महत्त्व आलंय. अगदी जे क्रिकेटचे नियमित प्रेक्षक नाहीत, अशांनीही वेळात वेळ काढलाय. देवांना नवससायास बोलणे सुरू आहे. मीडिया आणि सोशल मीडियावर दोन्ही संघांचे समर्थक एकमेकांवर शेलक्या भाषेत शरसंधान करताहेत. एकंदरीत सामन्यासाठी जबरदस्त माहौल तयार झालाय. मात्र असे असतानाही धोनीने पाकिस्तानी कर्णधाराच्या मुलासोबत दाखवलेल्या आपुलकीमुळे त्याचे कौतुक होत आहे.