शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: April 28, 2017 02:17 IST

आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त पी.व्ही. सिंधूने आज येथे शानदार कामगिरी करताना बॅडमिंडन आशिया चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

वुहान : आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त पी.व्ही. सिंधूने आज येथे शानदार कामगिरी करताना बॅडमिंडन आशिया चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली.रिओत रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूने अमानांकित जपानची खेळाडू अया ओहोरी हिला दुसऱ्या फेरीत ४0 मिनिटांत २१-१४, २१-१५ असे सहज नमवले.तथापि, पुरुष गटात अजय जयराम याचे आव्हान संपुष्टात आले. त्याला चीन तैपईच्या सु जेन हाओ याच्याकडून १९-२१, १0-२१ असा पराभव पत्करावा लागला.जागतिक क्रमवारीतील तृतीय मानांकित सिंधूने पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या दिनार दया अयुस्टिन हिचा एकतर्फी लढतीत २१-८, २१-१८ असा पराभव करीत आपल्या अभियानास सुरुवात केली. लंडन आॅलिम्पिकमधील कास्यपदक प्राप्त सायना नेहवाल, एच.एस. प्रणव आणि दुहेरीतील जोडी पहिल्याच फेरीत पराभूत झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले. पुरुष गटात जयरामने पहिल्या फेरीत चीनच्या पाचव्या मानांकित टियान होऊवेई याचा सरळ सेटस्मध्ये पराभव केला होता. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोपडा आणि एन. सिक्की रेड्डी यांना ५0 मिनिटे रंगलेल्या लढतीत झेंग सिवेई आणि चेन किंगचेन यांच्याकडून १५-२१, २१-१४, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला.सिक्की आणि अश्विनी पोनप्पा यांनादेखील दुहेरीत दक्षिण कोरियाच्या चाए यू जुंग आणि किम सो यियोंग या जोडीकडून ३७ मिनिटांत २0-२२, १६- असा पराभवाचा सामना करावा लागला.