शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पी. कश्यपची उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक

By admin | Updated: April 20, 2017 02:52 IST

राष्ट्रकुल चॅम्पियन आणि दुखापती दूर करून पुनरागमन केलेल्या अनुभवी शटलर पारुपल्ली कश्यप

चांग्झू : राष्ट्रकुल चॅम्पियन आणि दुखापती दूर करून पुनरागमन केलेल्या अनुभवी शटलर पारुपल्ली कश्यप याने चीन मास्टर्स ग्रां. प्री. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी, हर्षिल दानी यानेही चमकदार आगेकूच करताना उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.जानेवारीमध्ये झालेल्या प्रीमियर बॅडमिंटन लीगदरम्यान खांदा दुखावल्यानंतर पुनरागमन केलेल्या कश्यपने शानदार बाजी मारताना थायलंडच्या सुपान्यु अविहिंगसानोनचे आव्हान २१-१६, २१-१७ असे संपुष्टात आणले. ४६ मिनिटांमध्ये बाजी मारताना कश्यपने आक्रमक पवित्रा घेत स्मॅशचा प्रभावीपणे वापर करताना नेट्सजवळ चांगले नियंत्रण राखले. यानंतर, कश्यपचा सामना तिसऱ्या मानांकित चीनच्या कियाओ बिनविरुद्ध होईल.दुसरीकडे युवा खेळाडू हर्षिलने आपली छाप पाडली. त्याने चीनच्या यान रुनजीविरुद्ध जबरदस्त खेळ करताना २१-१६, २२-२० असे वर्चस्व राखले. पुढील फेरीत त्याच्यापुढे काहीसे कडवे आव्हान असून चीनच्या सुपर फेइशियांगविरुद्ध तो दोन हात करेल. दरम्यान, महिला एकेरीमध्ये भारताच्या साई उत्तेजिता राव चुक्का आणि श्री कृष्णा प्रिया कुदारावल यांना सुरुवातीला आपला गाशा गुंडाळावा लागला. साईला चीनच्या ली वेनमेईविरुद्ध झुंजार खेळ केल्यानंतरही ४-२१, २१-१३, १२-२१ असा पराभव पत्करावा लागला. तसेच, श्री कृष्णाला चीनच्याच ली युनने २१-१८, २१-११ असा धक्का दिला. (वृत्तसंस्था)