शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
4
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
5
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
6
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
7
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
8
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
9
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
10
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
11
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
12
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
13
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
18
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
19
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
20
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे

वन नाईट स्टार

By admin | Updated: July 7, 2014 05:20 IST

एका रात्रीत हिरो बनणे म्हणजे नक्की काय असते, हे नेदरलँडचा गोलरक्षक टीम क्रूल याला मिळालेली प्रसिद्धी पाहता सहजपणे ध्यानात येईल

साल्वाडोर : एका रात्रीत हिरो बनणे म्हणजे नक्की काय असते, हे नेदरलँडचा गोलरक्षक टीम क्रूल याला मिळालेली प्रसिद्धी पाहता सहजपणे ध्यानात येईल. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत झालेल्या अटीतटीच्या उपांत्यपूर्व सामन्यात या खेळाडूने पेनल्टी शूटआऊटमध्ये अफलातून कामगिरी करीत संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले. या जबरदस्त कामगिरीमुळे केवळ नेदरलँडच्या समर्थकांमध्येच नव्हे, तर जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या ओठावर क्रूलचे नाव आहे.या घटनेतील दोन आश्चर्याच्या गोष्टी म्हणजे क्रूल पेनल्टी शूटआऊटच्या थरारावेळी बदली गोलरक्षक म्हणून मैदानावर आला होता. दुसरे म्हणजे, हा त्याच्यासाठी विश्वचषकातील पदार्पणाचा सामना होता. सामन्यामध्ये निर्धारित वेळेत आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेत गोलशून्य बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये निकालाची कोंडी फुटणार होती. फुटबॉलचा विश्वचषक म्हटले की, प्रत्येक सामन्यात खेळाडूवर दबाव असतो. त्यातच तो सामना उपांत्यपूर्व फेरीसारख्या ‘नॉक आऊट’ पद्धतीचा असेल, तर मग विचारूच नका. अशा वेळी सिंहाचे काळीज असणारा खेळाडूच टिकाव धरू शकतो. कोस्टारिकाविरुद्ध अतिरिक्त वेळेचा खेळ संपायला काही क्षण शिल्लक असताना नेदरलँडचे प्रशिक्षक लुईस वॉन गॉल यांनी नियमित गोलरक्षक जॅस्पर सिलीसन याच्याऐवजी क्रूलला मैदानावर पाठवण्याचा जुगार खेळला. अखेर गॉल यांचा हाच जुगार नेदरलँडसाठी ‘टर्निंग पॉर्इंट’ ठरला.६.३ इंच अशी ताडमाड उंची लाभलेला २६ वर्षीय क्रूल जॅस्परला बदली गोलरक्षक म्हणून मैदानावर आला, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण, अशा निर्णायक क्षणी प्रशिक्षक गॉल असा काही अनपेक्षित बदल करतील, अशी कल्पना कुणालाच नव्हती. विशेषत: पेनल्टी किक वाचवण्याबाबत क्रूल कधीच आश्वासक गोलरक्षक नव्हता. मात्र, गॉल यांना आपल्या निर्णयावर आणि क्रूलवर विश्वास होता आणि हाच विश्वास क्रूलने पुरेपूर सार्थ ठरवला. या जिगरबाज गोलरक्षकाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रायन रूईझ व मायकेल उमाना यांच्या किक प्रभावीरीत्या अडवल्या. त्याच्या या अफलातून कामगिरीमुळेच ४-३ अशा फरकाने बाजी मारून नेदरलँड अंतिम ४ संघांत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. या कामगिरीबरोबरच क्रूलने विश्वचषकातील कारकिर्दीचा स्वप्नवत प्रारंभ केला. (वृत्तसंस्था)