शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

आता लक्ष्य आॅलिम्पिक पदक : दीपा करमाकर

By admin | Updated: April 20, 2016 03:24 IST

आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरलेली दीपा करमाकरने आता आॅगस्टमध्ये होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक पटकाविण्याचे लक्ष्य

रिओ जानेरिओ : आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरलेली दीपा करमाकरने आता आॅगस्टमध्ये होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक पटकाविण्याचे लक्ष्य असल्याचे म्हटले आहे. दीपाने आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत सोमवारी ५२.६९८ गुणांची कमाई करीत रिओ आॅलिम्पिकमध्ये कलात्मक जिम्नॅस्टिकसाठी पात्रता मिळविली. दीपाने आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघाच्या अधिकृत फेसबुकवर म्हटले आहे की,‘सुवर्णपदक पटकाविण्यापेक्षा दुसरा कुठला चांगला अनुभव असू शकत नाही. माझे पुढचे लक्ष्य आॅलिम्पिक पदक जिंकण्याचे आहे.’ दीपाने व्होल्ट््स फायनलमध्ये सुवर्णपदक पटकाविले. तिने २००८च्या आॅलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या उजबेकिस्तानच्या ओकसाना सीचा पराभव केला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या ११ पुरुष जिम्नॅस्टनी आॅलिम्पिकमध्ये सहभाग नोंदविला आहे, पण जिम्नॅस्टिकमध्ये प्रथमच भारतीय महिला आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. (वृत्तसंस्था)> कटरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आॅलिम्पिकसाठी पात्रता गाठणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरलेल्या दीपा करमाकरची प्रशंसा केली. या खेळाडूने आपल्या दृढ निर्धाराने देशाची मान उंचावली, अशा शब्दांत मोदी यांनी दीपाची प्रशंसा केली. श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना पंतप्रधान म्हणाले,‘दीपाने देशाची मान उंचावली. प्रथमच देशाच्या मुलीची आॅलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सुविधांचा अभाव असतानाही तिने मिळवलेले यश उल्लेखनीय आहे. जीवनात वाटचाल करण्यासाठी दृढ संकल्प असणे गरजेचे असते. या मोहिमेत सुविधांचा अभाव अडथळा बनायला नको.’