शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

नोव्हाक जोकोविच, सेरेना दुसऱ्या फेरीत

By admin | Updated: June 30, 2015 02:05 IST

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेले नोव्हाक जोकोविच व सेरेना विल्यम्स यांनी आज आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करीत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

लंडन : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेले नोव्हाक जोकोविच व सेरेना विल्यम्स यांनी आज आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करीत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. अव्वल मानांकित जोकोविचने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत एकतर्फी सामन्यात जागतिक क्रमवारीत ३३ व्या स्थानावर असलेल्या जर्मनीच्या फिलिप कोलश्राइबरचा ६-४, ६-४, ६-४ ने पराभव केला. पुढच्या फेरीत त्याची गाठ फिनलँडचा जार्को निमिनेन व आॅस्ट्रेलियाचा लिटन हेविट यांच्यातील विजेत्या खेळाडूसोबत पडणार आहे. -महिला विभागात सेरेनाने विम्बल्डनचे सहावे विजेतेपद पटकाविण्याच्या मोहिमेची शानदार सुरुवात करताना पहिल्या फेरीच्या लढतीत मार्गारिटा गासपारयानचा ६-४, ६-१ ने पराभव केला. २०१५ मध्ये आॅस्ट्रेलियन व फ्रेंच ओपन स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या सेरेनासाठी आॅल इंग्लंडमध्ये गेली दोन वर्षे निराशाजनक ठरली. तिला अनुक्रमे चौथ्या व तिसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. सेरेनाला बुधवारी दुसऱ्या फेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत ९३ व्या स्थानावर असलेल्या हंगेरीच्या टिमिया बाबोसच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. बाबोसने चेक प्रजासत्ताकच्या पेत्रा चेत्कोवस्काचा ७-६, ६-३ ने पराभव केला. -महिला एकेरीच्या अन्य सामन्यात चेक प्रजासत्ताकची ११ वी मानांकित कॅरोलिना प्लिसकोव्हाने अमेरिकेच्या ईरिना फालकोनीची झुंज ६-४, ४-६, ६-१ ने मोडून काढली तर २३ व्या मानांकित बेलारुसच्या व्हिक्टोरिया अजारेन्काने एस्टोनियाच्या एनेट कोनटावीटवर ६-२, ६-१ ने मात केली. २४ वे मानांकन प्राप्त इटलीची फ्लाविया पेनेटाला कजाखस्तानच्या जारिना दियासविरुद्ध ३-६, ६-२, ४-६ ने पराभव स्वीकारावा लागला. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या स्पेनच्या कार्ला सुआरेज नवारोला पहिल्या फेरीच्या लढतीत धक्कादायक निकालाला सामोरे जावे लागले. गेल्या वर्षीची ज्युनिअर चॅम्पियन येलेना ओस्तापेनकोने नवारोचा ६-२, ६-० ने पराभव केला. -पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा रोमानियाचा जोडीदार फ्लोरिन मेर्जियाने अमेरिकेच्या टिम स्मीजॅक व झेक गणराज्यचा जिरी वेसेलीचा सरळ दोन सेटमध्ये ६-३, ७-६ असा ६७ मिनीटात पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. -एकेरीमध्ये सिलिचने जपानच्या हिरोकी मोरियाचा ६-३, ६-२, ७-६ ने; तर क्रिरगियोसने अर्जेन्टिनाच्या डिएगो शवाटर्््जमॅनचा ६-०, ६-२, ७-६ ने पराभव केला.