शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

बोस्नियाविरुद्ध आत्मविश्वासाने खेळणार नायजेरिया

By admin | Updated: June 21, 2014 00:16 IST

नायजेरियात विश्वचषकाचा सामना पाहणारे २१ चाहत्यांचे बॉम्बस्फोटात निधन झाल्यामुळे या आफ्रिकन संघातील वातावरण दु:खमय झाले आहे;

पॉइंटर- नायजेरिया जागतिक क्रमवारीत ४४ आणि बोस्निया संघ २१ व्या क्रमांकावर आहे. एफ गटातील हे दोन्ही प्रतिस्पर्धी संघ आतापर्यंत एकदाही आमने-सामने उभे राहिले नाहीत. इराणला बरोबरीत ठेवणार्‍या नायजेरियाला बाद फेरीत पोहोचण्यासाठी बोस्नियाविरुद्धचा सामना ठरणार महत्त्वाचा. पराभव झाल्यास बोस्नियाला करावे लागणार पॅकअपकुइयाबा (ब्राझील) : नायजेरियात विश्वचषकाचा सामना पाहणारे २१ चाहत्यांचे बॉम्बस्फोटात निधन झाल्यामुळे या आफ्रिकन संघातील वातावरण दु:खमय झाले आहे; परंतु त्यांचे खेळाडू उद्या येथे बोस्नियात हर्जेगोविनाविरुद्ध होणार्‍या स्पर्धेत आपली सवार्ेत्तम कामगिरी करण्यास कटिबद्ध आहेत.योबेची राजधानी दमातारूयेथे मंगळवारी मोठ्या स्क्रीनवर ब्राझील आणि मेक्सिको यांच्यातील सामना पाहत असताना तेथे बॉम्बस्फोट झाला होता. संघाचा मीडिया अधिकारी बेन अलाइया यांनी या दु:खद घटनेमुळे खेळाडू आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी कटिबद्ध आहेत, असे सांगितले. बाद फेरीत पोहोचण्यासाठी नायजेरियाला हा विजय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर त्यांना याच गटातील उद्या पहिला सामना होणारा अर्जेंटिना आणि इराण यांच्यातील निकालाची माहिती त्यांना असणार असल्यामुळे बाद फेरीत जाण्यासाठी काय करावे लागेल याची व्यूहरचनाही त्यांना आखता येणार आहे.नायजेरियाने इराणविरुद्ध पहिला सामना गोलरहित ड्रॉ झाला होता. यामुळे त्यांना एक गुण मिळाला आहे. दुसरीकडे बोस्निया पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध २-१ ने पराभूत झाला होता आणि शनिवारी त्यांना पराभव पत्करावा लागल्यास पॅकअप करावे लागणार आहे.बोस्नियाचे प्रशिक्षक साफेट सुसिक यांनी म्हटले, अर्जेंटिनाविरुद्ध त्यांची व्यूहरचना अपयशी झाली होती; परंतु नायजेरियात ते कोणती कसर बाकी ठेवणार नाहीत. तो खूप महत्त्वाचा सामना नव्हता. पराभव ही फारशी अडचण नाही. अर्जेंटिना उर्वरित दोन्ही सामने जिंकेल. कारण त्यानंतर दुसर्‍या स्थानासाठी इराण, नायजेरिया आणि बोस्नियात चुरस असेल.बोस्निया आपल्या आघाडीच्या फळीत काही बदल करू शकतो. बोस्नियाकडून गोल करणारा बेदाद इबीसेव्हिचबरोबर इडेन जेकोदेखील आगामी दोन सामन्यांत आघाडीच्या फळीत असू शकतो. सुसिक म्हणाले, अर्जेंटिनाकडे मधल्या फळीत अनेक आघाडीचे खेळाडू असल्यामुळे आम्ही त्यांच्याविरुद्ध दोन स्ट्रायकर ठेवू शकलो नव्हतो.