शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पुढील विश्वचषक सहज खेळू शकतो

By admin | Updated: March 23, 2017 23:27 IST

माझ्यातील क्रिकेट अजून संपलेले नाही, याची जाणीव करून देत आपण कसोटीतून निवृत्ती किंवा कर्णधारपदावरून पायउतार झालो

रांची : माझ्यातील क्रिकेट अजून संपलेले नाही, याची जाणीव करून देत आपण कसोटीतून निवृत्ती किंवा कर्णधारपदावरून पायउतार झालो असलो तरी पुढील विश्वचषक सहज खेळू शकतो, असा विश्वास महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केला.निवृत्तीबाबत विविध कयास लावणाऱ्या टीकाकारांची तोंडे धोनीने स्वत:च्या वक्तव्यातून बंद केली. माहीने नुकतेच झारखंड संघाचे नेतृत्व करून विजय हजारे करंडकाची उपांत्य फेरी गाठली होती. कसोटीतून निवृत्त झाल्यानंतरही धोनीने स्थानिक क्रि केट सामन्यांत सहभागी होऊन स्वत:चा फिटनेस जपला. नुकताच त्याने एका व्यावसायिक कार्यक्रमात चाहत्यांशी संवाद साधला. या वेळी त्याला फिटनेस व भविष्यात देशाकडून किती काळ खेळण्याचा मानस आहे, याबाबत विचारण्यात आले.क्रि केटमधून केव्हा निवृत्त व्हावे लागेल, याचा अंदाज आपण कधीही घेऊ शकत नाही. एखादी मोठी दुखापतदेखील खेळाडूला निवृत्त होण्यास भाग पाडू शकते; पण सद्य:स्थितीत मी पुढील विश्वचषक सहज खेळू शकेन, असे धोनी म्हणाला. विश्वचषकाला आजपासून आणखी दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. या दोन वर्षांत काय होईल, हे सांगता येत नाही. याशिवाय, संघाच्या वेळापत्रकावरही पुढचे डावपेच ठरतील. सतत १० वर्षे क्रि केट खेळल्यानंतर आपण एखाद्या ‘व्हिंटेज कार’सारखे होतो. शरीराकडे अधिक लक्ष द्यावे लागते, असेही माहीने सांगितले.काही महिन्यांपासून भारतीय संघाचे कसोटी दौरे सुरू असल्याने धोनी राष्ट्रीय संघापासून दूर आहे. याच वेळी त्याने झारखंडकडून स्थानिक सामन्यांमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. झारखंड संघाचे नेतृत्व करून युवा सहकाऱ्यांना प्रोत्साहन दिले. धोनी आता भारतीय संघात थेट चॅम्पियन्स चषकात खेळताना दिसेल. आयसीसी चॅम्पियन्स चषकानंतर धोनी निवृत्तीची घोषणा करू शकतो, अशी शक्यता वारंवार वर्तविण्यात आली होती. (वृत्तसंस्था)