शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडची द. आफ्रिकेला‘ धोबीपछाड’

By admin | Updated: February 12, 2015 02:09 IST

ट्रेंट बोल्टने ५१ धावा देत घेतलेले पाच बळी आणि त्याआधी सांघिक केलेल्या फलंदाजीच्या बळावर बुधवारी विश्वचषकाच्या सराव सामन्यात न्यूझीलंडने द. आफ्रिकेला तब्बल

ख्राईस्टचर्च : ट्रेंट बोल्टने ५१ धावा देत घेतलेले पाच बळी आणि त्याआधी सांघिक केलेल्या फलंदाजीच्या बळावर बुधवारी विश्वचषकाच्या सराव सामन्यात न्यूझीलंडने द. आफ्रिकेला तब्बल १३४ धावांनी पराभवाचा धक्का दिला.घरच्या मैदानावर बलाढ्य मानल्या जाणाऱ्या न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेताच ५० षटकांत ८ बाद ३३१ धावा उभारल्या. नंतर गोलंदाजांच्या बळावर आफ्रिकेची झुंज ४४.२ षटकांत १९७ अशी मोडीत काढली. या विजयात सांघिक कामगिरी, तसेच बोल्टची गोलंदाजी निर्णायक ठरली. त्याने ९.२ षटकांत ५१ धावा देत अर्धा संघ बाद केला. अनुभवी डॅनियल व्हेट्टोरी, मिशेल मॅक्लेगन यांनी प्रत्येकी दोन व टिम साऊदी याने एक बळी घेतला. फलंदाजीत न्यूझीलंडकडून कर्णधार ब्रँडन मॅक्यूलम ५९, केन विलियम्सन ६६, रॉस टेलर ४१ आणि नाथन मॅक्यूलम नाबाद ३३ यांनी योगदान दिले. द. आफ्रिकेचे गोलंदाज व्हर्नोन फिलॅण्डर, काईल एबोट आणि व्हेन पार्नेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.विजयाचा पाठलाग करणाऱ्या द. आफ्रिकेचे सात फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. जेपी डुमिनी याने ९८ चेंडूंत आठ चौकारांसह सर्वाधिक ८० आणि आठव्या स्थानावर आलेल्या फिलॅण्डरने ५७ धावा ठोकल्यामुळे संघाला शंभरचा आकडा गाठता आला. कर्णधार एबी डिव्हिलियर्स जखमेतून सावरल्यानंतर खेळायला आला. त्याने २८ चेंडू खेळून २४ धावा केल्या. (वृत्तसंस्था)