शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
4
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
5
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
6
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
7
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
8
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
9
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
10
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
11
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
12
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
13
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
14
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
15
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
16
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
17
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
18
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
19
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
20
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

दुसऱ्या विजयास न्यूझीलंड सज्ज

By admin | Updated: March 18, 2016 03:39 IST

भारताचा दारुण पराभव केल्याने आत्मविश्वास बळावलेला न्यूझीलंड संघ टी-२० विश्वचषकाच्या शुक्रवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात आॅस्ट्रेलियाला देखील धक्का देण्यास सज्ज आहे.

धरमशाला : भारताचा दारुण पराभव केल्याने आत्मविश्वास बळावलेला न्यूझीलंड संघ टी-२० विश्वचषकाच्या शुक्रवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात आॅस्ट्रेलियाला देखील धक्का देण्यास सज्ज आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले दोन्ही संघ पहिल्या टी-२० विश्वविजेतेपदासाठी आतूर आहेत. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांना संकटाचा सामना करावा लागला पण गोलंदाजांनी सामना जिंकून दिला. ईश सोढी, मिशेल सॅन्टनर,आणि नाथन मॅक्यूलम या तिन्ही फिरकी गोलंदाजांनी भारताची फलंदाजी गुंडाळून १२६ धावांचा यशस्वी बचाव केला होता. ४७ धावांनी सामना जिंकून न्यूझीलंडने इतर संघांच्या मनात धडकी भरविली आहे. एचपीसीएची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असेल तर केन विलियम्सन पुन्हा एकदा फिरकी त्रिकूटाला संधी देऊ शकतो. भारताविरुद्ध टिम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट या वेगवान गोलंदाजांना बाहेर ठेवण्याचा साहसी निर्णय त्याने घेतला होता. वानखेडेवरील सराव सामन्यात न्यूझीलंडच्या फिरकीने आॅस्ट्रेलियाला बरेच चकविले होते. अनुभवी शेन वॉटसनने तर ‘अविश्वसनीय’ मारा असे संबोधले होते. दोन्ही संघ २००५ पासून केवळ चार सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळले. त्यात न्यूझीलनडने २०१० मध्ये सुपर ओव्हरपर्यंत रंगलेला सामना जिंकला तर आॅस्ट्रेलियाने तीन सामन्यात विजय मिळविला आहे. आॅस्ट्रेलियाला अलीकडे एकही टी-२० सामना जिंकता आला नाही. २०१५ पासून हा संघ सात टी-२० सामने खेळला आहे. भारत आणि द. आफ्रिकेविरुद्ध संघ निवडताना आॅस्ट्रेलियाची चांगलीच डोकेदुखी झाली होती. तरीही उत्कृष्ट अकरा खेळाडूंचा शोध कायम आहेच. (वृत्तसंस्था)न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), मार्टिन गुप्तिल, हेन्री निकोलस, ल्यूक रोंची, रॉस टेलर, कोलिन मुन्रो, मिशेल सॅन्टनर, नाथन मॅक्यूलम, ग्रांट इलियट, मिशेल मॅक्लाघन, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट, अ‍ॅडम मिल्ने, ईश सोढी आणि कोरी अ‍ॅण्डरसन.आॅस्ट्रेलिया : स्टीवन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, एश्टन एगर, नाथन कोल्टर-नील, जेम्स फॉल्कनर, अ‍ॅरोन फिंच, जॉन हेस्टिंग्स, जोश हेजलवूड, उस्मान ख्वाजा, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, पीटर नेव्हिल, अ‍ॅन्ड्रयू टाय, शेन वॉटसन, अ‍ॅडम जाम्पा.सामन्याची वेळदुपारी ३.०० पासूनस्थळ : एचपीसीए स्टेडियम, धरमशाला