शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंड -लंका सामना

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

९८ धावांनी मात : फलंदाजांची कमाल; गोलंदाजांचीही धमालन्यूझीलंडकडून लंकेची शिकारख्राईस्टचर्च : न्यूझीलंडने विश्वचषकाच्या सलामीला शनिवारी गत उपविजेत्या लंकेची ९८ धावांनी शिकार केली. न्यूझीलंडच्या ३३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणार्‍या लंकेचा डाव ४६.१ षटकांत सर्व बाद २३३ धावांत आटोपला. लंकेकडून कुणीही फलंदाज फारसा चमकला नाही. सलामीचा लाहिरू थिरिमाने याने सर्वाधिक ६५; तसेच ...


९८ धावांनी मात : फलंदाजांची कमाल; गोलंदाजांचीही धमाल
न्यूझीलंडकडून लंकेची शिकार

ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडने विश्वचषकाच्या सलामीला शनिवारी गत उपविजेत्या लंकेची ९८ धावांनी शिकार केली. न्यूझीलंडच्या ३३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणार्‍या लंकेचा डाव ४६.१ षटकांत सर्व बाद २३३ धावांत आटोपला.
लंकेकडून कुणीही फलंदाज फारसा चमकला नाही. सलामीचा लाहिरू थिरिमाने याने सर्वाधिक ६५; तसेच कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने ४६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून कोरी ॲण्डरसन, डॅनियल व्हे˜ोरी, टीम साऊदी, ॲडम मिल्ने आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. व्हे˜ोरीने दहा षटकांत केवळ ३४ धावा दिल्या.
त्याआधी यजमान संघाकडून ॲण्डरसनने ७५, कर्णधार ब्रँडन मॅक्युलम ६५, केन विलियम्सन ५७ आणि मार्टिन गुप्तिल ४६ धावा यांच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर न्यूझीलंडने ६ बाद ३३१ धावा उभारल्या. पाठलाग करणार्‍या लंकेकडून थिरिमाने-दिलशान यांनी सलामीला १३ षटकांत ६७ धावा ठोकल्या. अनुभवी व्हे˜ोरीने दिलशानचा आपल्याच चेंडूवर झेल घेत पहिला धक्का दिला. कुमार संगकाराने ३९ धावा केल्या. यादरम्यान त्याने विश्वचषकात हजार धावा पूर्ण केल्या; तसेच वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यात दुसर्‍या स्थानावर झेप घेतली. व्हे˜ोरीने अनुभवी माहेला जयवर्धनेला भोपळा न फोडू देता रोंचीकडे झेल देण्यास बाध्य केले. संगकारा पायचित झाल्याने लंकेची स्थिती ४ बाद १२९ झाली होती. मिल्नेने करुणारत्नेे १४ आणि मेंडिस ४ यांना एकाच षटकात टिपले. ३३ व्या षटकात कुलसेकरा बाद झाला. लंकेला दहा षटकांत विजयासाठी १२३ धावांची गरज होती; पण ४२ व्या षटकात साऊदीने कर्णधार मॅथ्युजला बाद करताच विजयाच्या आशा मावळल्या.
त्याआधी नाणेफेक गमाविल्यानंतर फलंदाजी मिळालेल्या न्यूझीलंडकडून मॅक्युलम-गुप्तिल यांनी १५.५ षटकांत १११ धावांची सलामी दिली. या जोडीने लसिथ मलिंगाच्या चार षटकांत ४२ धावा वसूल करताच त्याला हटविण्यात आले. त्याने दहा षटकांत एकूण ८४ धावा मोजल्या. मॅक्युलम व गुप्तिल बाद झाल्यानंतर ॲण्डरसनने ४६ चेंडू टोलवित आठ चौकार, दोन षटकारांसह संघाच्या ३०० धावा पूर्ण केल्या. त्याने रोंचीसोबत (नाबाद २९) सहाव्या गड्यासाठी ७३ धावांची भागीदारी केली. लंकेकडून मेंडिस आणि लकमल यांनी प्रत्येकी दोन; तर हेराथ आणि कुलसेकरा यांनी एकेक गडी बाद केला.
(वृत्तसंस्था)
०००००