शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडची इंग्लंडवर मात

By admin | Updated: June 14, 2015 01:52 IST

रॉस टेलरने केलेले शानदार शतक (११९) व गोलंदाजांनी केलेल्या संयमित माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला १३ धावांनी पराभूत केले.

लंडन : रॉस टेलरने केलेले शानदार शतक (११९) व गोलंदाजांनी केलेल्या संयमित माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला १३ धावांनी पराभूत केले. या विजयामुळे पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने १-१ अशी बरोबरी साधली आहे. सामन्यादरम्यान आलेल्या पावसामुळे डकवर्थ-लुईस नियमाचा आधार घेण्यात आला.न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ३९८ धावा केल्या; मात्र पावसामुळे इंग्लंडला ४६ षटकांत ३७९ धावांचे लक्ष्य देण्यात आले. इंग्लंडची सुरुवात धमाकेदार झाली. जॅसन रॉय व अ‍ॅलेक्स हेल्स यांनी पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली. नॅथन मॅक्युलमने रॉयला बाद करून ही जोडी फोडली. त्याच्यानंतर आलेल्या ज्यो रुटला मात्र सहाच धावा करता आल्या. त्याला मिशेल सेंटनरने बाद केले. अलेक्स हेल्स मात्र एका बाजूने चांगली फलंदाजी करीत होता. त्याने ४९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांच्या साह्याने ५४ धावा केल्या; मात्र त्यालाही सेंटनरने बाद केले. सेंटनरने एकाच षटकात २ बळी घेऊन इंग्लंडला अडचणीत आणले; मात्र इयान मॉर्गनने जोस बटलरच्या साह्याने ९६ धावांची भागीदारी केली. मॉर्गनने ४७ चेंडूंत धुवाधार ८८ धावा केल्या; मात्र मॅक्लेनगनने त्याला बाद करून इंग्लंडच्या आशा संपुष्टात आणल्या. इंग्लंडला ९ बाद ३६५ धावाच करता आल्या.तत्पूर्वी, रॉस टेलर नाबाद ११९ व केन विल्यम्सनच्या ९३ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने ५ बाद ३९८ धावा केल्या. इंग्लंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ४०८ धावा केल्या होत्या. आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने त्यांना उत्तर देत आतापर्यंत दोन नंबरची सर्वोच्च धावसंख्या उभारली. २००८मध्ये न्यूझीलंडने आयर्लंडविरुद्ध ४०२ धावा केल्या होत्या.(वृत्तसंस्था)