शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या नव्या धोरणाचा नेमबाजांना फटका

By admin | Updated: August 7, 2015 22:32 IST

गेल्या काही आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये पदकांची हमखास कमाई करून देणाऱ्या शूटिंग या खेळाकडे क्रीडा मंत्रालयाने विशेष लक्ष्य केंद्रित केले आहे. नव-नवे धोरण राबवून नेमबाजांना योग्य त्या संधी

नाशिक : गेल्या काही आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये पदकांची हमखास कमाई करून देणाऱ्या शूटिंग या खेळाकडे क्रीडा मंत्रालयाने विशेष लक्ष्य केंद्रित केले आहे. नव-नवे धोरण राबवून नेमबाजांना योग्य त्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. मात्र भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ऐन आॅलिम्पिकच्या तोंडावरच नवे धोरण अंमलात आणल्याने त्याचा फटका एका गुणवंत नेमबाजाला बसला आहे. आॅलिम्पिकची पूर्वतयारी समजल्या जाणाऱ्या शूटिंग वर्ल्डकपमध्ये निवड झाल्यानंतरही या नेमबाजाला केवळ क्रीडा प्राधिकरणाच्या नव्या धोरणामुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. ५ ते १५ आॅगस्टदरम्यान अजरबैजान या देशात चौथी शूटिंग वर्ल्डकप स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी भारतातून गुरप्रित सिंग, विजयकुमार व अक्षय अष्टपुत्रे या तीन नेमबाजांची निवड करण्यात आली होती. पुढील वर्षी होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेच्यादृष्टीने ही स्पर्धा अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जात असल्याने या तिन्ही नेमबाजांना आॅलम्पिक कोटा जिंकण्याची सुवर्णसंधीच चालून आली होती. मात्र भारतीय क्रीडा प्राधिकरण व राष्ट्रीय नेमबाजी संघटनेने ऐन आॅलिम्पिक स्पर्धेच्या तोंडावरच नवे धोरण अंमलात आणल्याने त्याचा परिणाम वर्ल्डकपसाठी निवड झालेल्या या नेमबाजांवर झाला आहे. नव्या धोरणानुसार देशांतर्गत खेळलेल्या नेमबाजी स्पर्धांमध्ये ‘मिनिमम ट्रायव्हलिंग स्कोर’ (एमटीएस) मिळविलेल्या नेमबाजांनाच शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जाणार असल्याचे जाहीर केल्याने, ‘स्व-खर्चाने स्पर्धेत सहभागी व्हा अन्यथा माघार घ्या’ हा एकमेव पर्याय या नेमबाजांसमोर होता. दरम्यान, या नव्या धोरणामध्ये गुरप्रित सिंग यांचाच समावेश करण्यात आल्याने अन्य दोन नेमबाज स्पर्धेला मुकणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र विजयकुमार यांना आर्मी कोट्यातून आर्थिक सहाय्य मिळाल्याने त्यांना या स्पर्धेत भाग घेता आला, तर अक्षय अष्टपुत्रे या गुणवंत नेमबाजाला केवळ आर्थिक सहाय्य न मिळाल्याने स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारच्या या भूमिकेमुळे अक्षय अष्टपुत्रे या नेमबाजाचे पर्यायाने देशाचे नुकसान झाले, अशा प्रतिक्रिया आता व्यक्त केल्या जात आहेत.