शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

यष्टीवर मारा करणे आवश्यक : हेजलवूड

By admin | Updated: March 7, 2017 00:39 IST

आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडच्या मते दुसऱ्या कसोटी सामन्यात पुढील दोन दिवस वेगवान गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात

बेंगळुरू : आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडच्या मते दुसऱ्या कसोटी सामन्यात पुढील दोन दिवस वेगवान गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. चौथ्या दिवशी भारताचा डाव झटपट गुंडाळण्यासाठी यष्टीवर मारा करण्यावर भर देणार असल्याचे हेजलवूडने स्पष्ट केले. भारताने या कसोटीत दुसऱ्या डावात ४ बाद २१५ धावांची मजल मारली असून, १२६ धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना हेजलवूड म्हणाला, ‘या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज बराच बाहेर मारा करीत आहे. खेळपट्टीवर असमान उसळी मिळत असून काही चेंडू अधिक उसळत आहेत. यष्टीवर सरळ मारा करणे आवश्यक आहे. फिरकीपटूंनी चांगला मारा केला. आम्ही मंगळवारी चांगला मारा करीत पुनरागमन करण्यात यशस्वी ठरू, असा विश्वास आहे.’हेजलवूड म्हणाला, की मायदेशात खेळताना गोलंदाजांना उजव्या यष्टीबाहेर मारा करण्याची सवय आहे. त्यामुळे बॅटची कड घेऊन फलंदाजाला झेलचित करण्याची संधी असते, पण येथे भारतात मात्र पायचित करण्यावर अधिक भर देणे आवश्यक आहे.दरम्यान, हेजलवूडने भारतीय वेगवान गोलंदाजांची प्रशंसा केली. हेजलवूड म्हणाला, ‘येथे चेंडू फार स्विंग किंवा रिव्हर्स स्विंग होत नाही. त्यामुळे सोपी रणनीती अमलात आणावी लागते. पण बरेचदा असा मारा करणे अडचणीचे ठरते. भारतीय गोलंदाजांनी रविवारी बराच वेळ चांगला मारा केला. आम्हाला आज आणखी सुधारणा करण्याची संधी होती. ’हेजलवूडने चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांचीही प्रशंसा केली. यांच्या कामगिरीमुळे भारताला या कसोटीत पुनरागमन करता आले. सध्या या कसोटीत उभय संघांना समान संधी आहे, असेही त्याने सांगितले. (वृत्तसंस्था)