शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय पंचांना ‘शिकवणी’ची गरज : के़ हरिहरन

By admin | Updated: April 17, 2017 01:17 IST

भारतीय पंचांच्या कामगिरीचा दर्जा खालावत चालला आहे, आयपीएलमध्ये पंचांकडून होणाऱ्या चुकांमुळे त्या सर्वांच्या नजरेत येत आहेत

नवी दिल्ली : भारतीय पंचांच्या कामगिरीचा दर्जा खालावत चालला आहे, आयपीएलमध्ये पंचांकडून होणाऱ्या चुकांमुळे त्या सर्वांच्या नजरेत येत आहेत. यावर उपाय म्हणून भारतीय पंचांच्या कामगिरीचे मूल्यमापन त्यावर मार्गदर्शन करणारी व्यवस्था उभारण्याची गरज माजी आंतरराष्ट्रीय पंच के़ हरिहरन यांनी व्यक्त केली.वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हरिहरन यांनी म्हटले आहे, की ज्याप्रमाणे निवड समितीचे सदस्य खेळाडूंच्या कामगिरीवर नजर ठेवून असतात, तसे पंचांसाठी मेंटॉरची गरज आहे. सामन्यातील पंचांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्याचे आणि सामन्यातील चुकांवर आणि कामगिरीवर पंचांना मार्गदर्शन करण्याचे काम हे मेंटॉर करतील, असे हरिहरन यांचे म्हणणे आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत पंचांकडून मोठ्या चुका झाल्या आहेत. या चुका टाळता आल्या असत्या. आयपीएलला जागतिक पातळीवर मोठा प्रेक्षकवर्ग असल्याने या चुका ठळकपणे निदर्शनास येत आहेत. त्याची सोशल मीडियावर मोठी चर्चाही रंगली आहे. आपल्याकडे देशांतर्गत पंचांसाठी मार्गदर्शन करणारी कार्यप्रणाली नाही. त्याचा तोटा होत आहे. हरिहरन यांनी दोन कसोटी आणि ३४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंचगिरी केली असून ते बीसीसीआयच्या समीक्षा समितीचे सदस्य आहेत. पंचगिरीचा स्तर सुधारण्यासाठी वेळोवेळी बदल करण्याचा प्रस्ताव देण्याचे काम ही समिती करीत असते. पॅनेलमध्ये हरिहरन यांच्याशिवाय माजी पंच विजय चोपडा, आय. शिवराम आणि व्ही. के. रामास्वामी यांचा समावेश आहे. सध्या देशात ११० बीसीसीआय मान्यताप्राप्त पंच आहेत. हरिहरन यांनी सांगितले, की देशातील आघाडीच्या २५ पंचांसाठी मेंटॉर नियुक्तीचा प्रस्ताव आम्ही बीसीसीआयला दिला आहे. याबाबतीत आता बीसीसीआयच्या पुढाकाराची गरज आहे.आयपीएलमधील खराब पंचगिरी...मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात १२ एप्रिलला झालेल्या सामन्याच्या पहिल्या डावातील पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकात म्हणजे सहाव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरने बुमराहला चौकार ठोकला. यानंतर नियमाप्रमाणे पुढील षटकातील पहिला चेंडू शिखर धवनने खेळणे अपेक्षित होते. परंतु, सातव्या षटकातील पहिला चेंडूदेखील वॉर्नरनेच खेळला आणि त्यावर एक धाव घेतली. विशेष म्हणजे, पंचांच्या लक्षात ही बाब आली तेव्हा खूप उशीर झाला होता.पंचांच्या खराब कामगिरीचा फटका मुंबई इंडियन्सच्या जोस बटलर, रोहित शर्मा यांनाही बसला. बॅटला चेंडू चाटून गेला असताना त्यांना पायचित दिले़