पेनल्टी शूट आऊटमध्ये कोस्टारिकाचा ४-३ ने पराभव
ऑनलाइन टीम
साल्वाडोर, दि. ६ - पेनल्टी शूट आऊटमध्ये कोस्टारिका संघाचा ४-३ असा पराभव करीत नेदरलँड संघाने मोठ्या दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.
फिफा विश्चचषकात जायंट किलर ठरलेल्या कोस्टारिका संघाला नेदरलँड संघाविरूध्द पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय वेळेनुसार सकाळी साडेचार वाजेपर्यंत चाललेल्या या सामन्यात पहिल्या हाफ, नंतरच्या हाफ टाईममध्ये एकाही खेळाडूला गोल करता आला नाही. त्यानंतर अर्ध्या तासाचा एक्स्ट्रा टाईम वाढवून देण्यात आला परंतू या एक्स्ट्रा टाईममध्येही गोल करण्यात खेळाडूला अपयश आले. दोन्ही संघाच्या बाजुने गोल करण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले परंतू प्रतिस्पधी खेळाडूंनी ते हाणून पाडले. अखेर त्यानंतर पेनल्टी शूट आऊट देण्यात आले. पेनल्टी शूट आऊटमध्ये नेदरलँडसच्या तीन खेळाडूने पाठोपाठ गोल केले तर कोस्टारिकाच्या खेळाडूंने केलेले दोन गोल नेदरलँडच्या गोलकिपरने अडविल्याने अखेर नेदरलँडला या सामन्यात ४-३ असा विजय मिळविता आला. २०१० मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतही नेदरलँडच्या संघाने आपल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीत धडक मारली होती. तर आता २०१४ च्या विश्वचषकात या संघाने सेमीफायनल गाठली आहे.