फॉर्मची घेतली दखल : १६ कोटी रुपयांत दिल्लीने घेतले विकतबंगळुरू : स्थानिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करूनही विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाला ‘नकोसा’ झालेला युवराज सिंग इंडियन प्रीमिअर लीगला (आयपीएल) अजूनही हवाहवासा आहे. सोमवारी पार पडलेल्या आयपीएलच्या लिलावात युवीसाठी दिल्ली डेअर डेव्हिल्सने १६ कोटी रुपये मोजले. आयपीएलच्या आठव्या सत्रासाठी झालेल्या लिलावात युवी हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.चार संघांमध्ये चढाओढदोन कोटी बेस प्राइज असलेल्या युवीला संघात घेण्यासाठी दिल्लीसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात शीतयुद्ध पाहायला मिळाले. युवीसाठी राजस्थान आणि पंजाब यांनी बोली लावली होती, परंतु सात कोटींच्या वर किंमत गेल्याबरोबर या संघांनी माघार घेतली. कर्स्टनसोबत खेळण्याचा आनंदभारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्यासोबत खेळण्याची संधी पुन्हा मिळाल्याचा आनंद होत आहे. लिलावावेळी झोपलो होतो. माझ्या घरी काही पाहुणे आले आणि त्यांनी याबाबत मला सांगितले. कर्स्टन यांच्यासोबत खेळण्याचा योग पुन्हा जुळून आला. - युवराज सिंग हव्या असलेल्या खेळाडूसाठी मोठ्यात मोठी किंमत मोजण्याची आमची तयारी होती. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत युवीला संघात सहभागी करून घ्यायचे होते. - गॅरी कर्स्टन, दिल्लीचे प्रशिक्षकएकही प्रथम श्रेणी सामना न खेळलेला फिरकीपटू केसी चारिअप्पा याला २.४० कोटी रुपयांत विकत घेऊन कोलकाता नाइट रायडर्सने सर्वांना अचंबित केले.16 कोटीयुवराज सिंग (दिल्ली)10.5 कोटीदिनेश कार्तिक (बंगळुरू)07 कोटीअँजेलो मॅथ्युज (दिल्ली)04 कोटीझहीर खान (दिल्ली)03.8 कोटीट्रेंट बोल्ट (हैदराबाद)03.5 कोटीअमित मिश्रा (दिल्ली)
‘नकोसा’ युवी आयपीएलला हवाहवासा!
By admin | Updated: February 17, 2015 02:44 IST