शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

नदाल स्पर्धेबाहेर

By admin | Updated: July 4, 2015 02:04 IST

दोन वेळेसचा चॅम्पियन स्पेनचा टेनिस स्टार राफेल नदाल याचा विम्बल्डनचा प्रवास दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आला. तुलनेने कमकुवत असलेल्या जर्मनीच्या डस्टिन ब्राऊन

लंडन : दोन वेळेसचा चॅम्पियन स्पेनचा टेनिस स्टार राफेल नदाल याचा विम्बल्डनचा प्रवास दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आला. तुलनेने कमकुवत असलेल्या जर्मनीच्या डस्टिन ब्राऊन याने जबरदस्त सर्व्हिस आणि व्हॉलीच्या बळावर अफलातून खेळ करीत दहाव्या मानांकित राफेल नदाल याच्यावर ७-५, ३-६, ६-४ असा सनसनाटी विजय मिळवला. यंदाच्या विम्बल्डनमधील हा सर्वात सनसनाटी निकाल ठरला.तथापि, माजी नंबर वन आणि १४ ग्रँडस्लॅमचा विजेता नदालला अजूनही आपली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याची आशा आहे. तो म्हणाला, ‘मी पराभूत झालो. त्यामुळे मी दु:खी आहे; परंतु हा खेळ आहे. चांगले आणि वाईट दिवस येतात. निश्चितच आजचा दिवस माझ्यासाठी वाईट होता. तथापि, मी खेळणे पुढेही चालू ठेवणार नाही. हा काही अखेर नाही. जीवन आणि माझी कारकीर्द चालूच राहील. ही परिस्थिती बदलण्यासाठी मला आधीच्या तुलनेत जास्त मेहनत घ्यावी लागेल.’ (वृत्तसंस्था)डस्टिन ब्राऊन याचे नदालविरुद्ध विजय-पराभवाचे रेकॉर्ड हे आता २-० असे झाले आहे. त्याने गतवर्षी हॉल येथे नदालला नमवले होते. २९ वर्षीय नदाल येथे गेल्या ४ वर्षांत दुसऱ्या, पहिल्या, चौथ्या व दुसऱ्या फेरीच्या पुढे जाऊ शकला नाही. १४ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या नदालला प्रत्येक वेळेस अव्वल १00 च्या पुढील क्रमवारी असलेल्या खेळाडूंनी पराभूत केले आहे.नदाल याआधी २0१२मध्ये विश्व रँकिंगमध्ये १00 व्या स्थानी असणाऱ्या लुकास सोलो याच्याकडून दुसऱ्या फेरीत, २0१३मध्ये स्टीव्ह डार्किस याच्याविरुद्ध पहिल्या फेरीत आणि गेल्या वर्षी निक किरगियोस याच्याकडून चौथ्या फेरीत पराभूत होऊन या ग्रँडस्लॅम विम्बल्डन स्पर्धेतून ‘आऊट’ झाला होता.