शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मरे, क्विटोव्हाची आगेकूच

By admin | Updated: July 3, 2015 04:34 IST

माजी चॅम्पियन अँडी मरे आणि महिला गटातील गतविजेती पेट्रा क्विटोव्हा यांनी आपली जबरदस्त कामगिरी कायम ठेवताना आज येथे सरळ सेट्समध्ये सहज विजय मिळवताना

लंडन : माजी चॅम्पियन अँडी मरे आणि महिला गटातील गतविजेती पेट्रा क्विटोव्हा यांनी आपली जबरदस्त कामगिरी कायम ठेवताना आज येथे सरळ सेट्समध्ये सहज विजय मिळवताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेची तिसरी फेरी गाठली.तृतीय मानांकित आणि २0१३ चा चॅम्पियन मरे याला तिसरी फेरी गाठण्यासाठी फारसे कष्ट पडले नाहीत. त्याने नेदरलँडच्या रॉबिन हास याचा एक तास २७ मिनिटे रंगलेल्या सामन्यात ६-१, ६-१, ६-४ असा पराभव केला. या २८ वर्षीय खेळाडूने २५ विनर्स मारले.विजयानंतर मरे म्हणाला, की मी सामन्यात खूप चांगली सुरुवात केली. माझी सुरुवात वेगवान होती, तर रॉबिन थोडा संथ खेळत होता. तथापि, नंतर त्याने चांगला खेळ केला. या ब्रिटिश खेळाडूला अंतिम १६ मध्ये स्थान पक्के करण्यासाठी इटलीच्या आंद्रियास सेपी अथवा क्रोएशियाच्या बोर्ना कोरिच याच्याविरुद्ध दोन हात करावे लागतील.मरेबरोबरच ब्रिटनचा अन्य एक खेळाडू जेम्स वॉर्डनेदेखील तिसरी फेरी गाठली. त्याने झेक प्रजासत्ताकच्या जिरी वेस्लेला चार सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-२, ७-६, ३-६, ६-३ असे नमवले. २00२ नंतर दोन ब्रिटिश खेळाडू विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवण्याची ही पहिलीच घटना आहे. पुरुष गटात स्पेनच्या २0 व्या मानांकित रॉबर्टो बतिस्ता आणि आॅस्ट्रेलियाच्या सॅम ग्रोथ हेदेखील पुढील फेरी गाठण्यात यशस्वी ठरले.महिला गटात विद्यमान चॅम्पियन क्विटोव्हानेदेखील ५७ मिनिटांत जपानच्या कुरुमी नारा हिचे आव्हान संपुष्टात आणले. झेक प्रजासत्ताकच्या या खेळाडूने द्वितीय मानांकित खेळाडूला ६-२, ६-0 असे सहज पराभूत केले.जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडू कारेलिन वोज्नियाकी हिने काही प्रतिकूल स्थितीचा सामना केल्यानंतर तिसरी फेरी गाठली. तिने झेक प्रजासत्ताकच्या जागतिक क्रमवारीतील ८३ वी मानांकित खेळाडू डेनिसा एलेरटोव्हाचा ६-१, ७-६ असा पराभव केला. डेन्मार्कची २४ वर्षीय खेळाडू आणि पाचव्या मानांकित वोज्नियाकीची पुढील लढत इटलीच्या ३१ व्या मानांकित कॅमिला जियोर्गीशी होईल. कॅमिलाने स्पेनच्या लारा अरुआबरेना हिचा ६-0, ७-६ असा पराभव केला. पोलंड येथील २0१२ ची उपविजेती अग्निस्ज्का रंदावास्का हिने अवघ्या ४८ मिनिटांत अलिजा टोमलजानोविच हिचे ६-0, ६-२ असे आव्हान मोडीत काढताना पुढील फेरी गाठली.रशियाच्या आठव्या मानांकित एकटेरिना मकारोव्हाला मात्र पराभवाची चव चाखावी लागली. तिला स्लोव्हाकियाच्या मॅगडलेना रिबारिकोव्हा हिने ६-२, ७-५ असे सरळ सेटस्मध्ये पराभूत केले. (वृत्तसंस्था)मकारोव्हाआधी तृतीय मानांकित सिमोना हालेप, सातवी मानांकित अ‍ॅना इव्हानोविच आणि नववी मानांकित कार्ला सुआरेज नवारो यांनादेखील दुसऱ्या फेरीच्या पुढे जाण्यात अपयश आले. फ्रान्सच्या २५ व्या मानांकित एलिज कार्नेटला आज दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला.जर्मनीची दहावी मानांकित एंजेलिक केरबर तिसऱ्या फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरली. तिने रशियाच्या अनस्तेसिया पावलिचेनकोव्हाचे आव्हान ७-५, ६-२ असे मोडीत काढले.जर्मनीच्या १८ व्या मानांकित आणि २0१३ ची उपविजेती सॅबाईन लिस्कीने अमेरिकेच्या क्रिस्टियाना मॅकहाले हिचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २-६, ७-५, ६-१ असा पराभव केला. आता तिची लढत १५ व्या मानांकित स्वीस खेळाडू टिमिया बाकसिन्स्कीशी होईल.