सूर्यकुमार यादवचे शतकऔरंगाबाद : म्हैसूर येथे कर्नाटक क्रिकेट संघटनेतर्फे सुरू असलेल्या अखिल भारतीय थिम्मप्पया मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत नॅशनल क्रिकेट अकॅडमी संघाविरुद्ध मुंबई क्रिकेट संघटनेच्या संघाने दमदार सुरुवात केली. सूर्यकुमार यादवच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर मुंबईने दिवसअखेर ४ बाद २१३ पर्यंत मजल मारली.अभिषेक नायर याच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करली. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने नाबाद १0३ आणि अभिषेक नायर याने नाबाद ४५ धावांची खेळी करताना मुंबई संघाच्या धावसंख्येला मजबुती दिली. या दोघांशिवाय आदित्य तारेने ३८ धावा केल्या. औरंगाबादचा शैलीदार फलंदाज अंकित बावणेच्या नेतृत्वाखालील नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या दीपक चहरने ५३ धावांत २ गडी बाद केले. या सामन्याआधी नॅशनल क्रिकेट अकॅडमीने केरळचा एक डाव व ६ धावांनी धुव्वा उडवला होता आणि दुसर्या सामन्यात आसाम संघावर दणकेबाज विजयाची नोंद केली होती. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी या सामन्याला विशेष महत्त्व आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
एनसीएविरुद्ध मुंबईची दमदार सुरुवात
By admin | Updated: August 3, 2014 00:54 IST