शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

गतविजेत्याला मुंबईचे आव्हान

By admin | Updated: March 3, 2015 01:56 IST

यंदाच्या आय-लीग मोसमातील खराब सुरुवातीनंतर जबरदस्त फॉर्ममध्ये येत विजयी ट्रॅकवर आलेल्या मुंबई एफसी गतविजेत्या बंगळुरू एफसीला धक्का देण्यासाठी सज्ज आहे.

मुंबई : यंदाच्या आय-लीग मोसमातील खराब सुरुवातीनंतर जबरदस्त फॉर्ममध्ये येत विजयी ट्रॅकवर आलेल्या मुंबई एफसी गतविजेत्या बंगळुरू एफसीला धक्का देण्यासाठी सज्ज आहे. स्पर्धेतील ९व्या फेरीतील रंगणारा सामना कुलाबा येथील कुपरेज स्टेडियमवर रंगणार आहे.स्पोर्टिंग क्लब दी गोवा संघाला ३-१ असे लोळवून आत्मविश्वास मिळवलेल्या बंगळुरू संघ मुंबईला त्यांच्याच मैदानात पराभूत करून गुणतालिकेत प्रथम स्थान काबीज करण्याचा विश्वास बाळगून आहे. मात्र सध्या विजयी घोडदौड करीत असलेल्या मुंबई एफसीचे कडवे आव्हान समोर असल्याची जाणीवदेखील बंगळुरू संघाला आहे.तब्बल ५ वर्षांनंतर घरच्या मैदानावर परतलेल्या मुंबई एफसी संघाने अचानकपणे कात टाकली. घरच्या मैदानावर परतल्यापासून मुंबई संघ बलाढ्य वाटू लागला आहे. विशेष म्हणजे गेल्या चारही सामन्यांमध्ये मुंबई एफसी अपराजित राहिले असून या शानदार कामगिरीच्या जोरावर त्यांनी गुणतालिकेत तळाच्या स्थानावरून १० गुणांसह थेट सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. तर बंगळुरू संघ १३ गुणांसह तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. २०१० नंतर पहिल्यांदाच मुंबईने मोहन बागान, एअर इंडिया आणि पुणे एफसी यांना नमवून सलग ३ विजयांची नोंद केली आहे. त्यामुळे मुंबईचा हाच विजयी धडाका कायम राखण्यावर भर असेल. त्याचवेळी मंगळवारी होणाऱ्या सामन्यात खडतर आव्हान असल्याने विजयासाठी मुंबईला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. बंगळुरू संघाची कामगिरी घरच्या मैदानापेक्षा बाहेर कायमच चांगली झाली असल्याने मुंबईला तगडे आव्हान असेल. त्याचबरोबर बंगळुरूचा अव्वल खेळाडू सीन रुनी याने गोवा संघाविरुद्ध २ गोल करून जबरदस्त फॉर्म मिळवला असल्याने मुंबईला सावध राहावे लागेल. शिवाय सुनील छेत्रीसारख्या कसलेल्या खेळाडूमुळे बंगळुरूच्या आक्रमणाला आणखी धार आली आहे. (क्रीडा प्रतिनिधी)ेमुंबई एफसीने मोसमातील निराशाजनक सुरुवातीनंतर जबरदस्त पुनरागमन करत इतर संघांना धोक्याचा इशारा दिला आहे. सध्या मुंबई गुणतालिकेत १० गुणांसह सहाव्या स्थानी आहे. जर का मंगळवारी मुंबईने बंगळुरूला धक्का देण्याची किमया केली तर मुंबईला आपले स्थान आणखी बळकट करता येईल. शिवाय घरच्या मैदानावरील शानदार कामगिरीमुळे आत्मविश्वास उंचावलेल्या मुंबईकडून बलाढ्य बंगळुरूला नक्कीच कडवी लढत मिळेल.बंगळुरू संघ शारीरिक व मानसिकदृष्ट्या बलवान असून त्यांना नमवण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम खेळ करावाच लागेल. - खालीद जमील, मुंबई एफसी - प्रशिक्षकआतापर्यंत खेळल्या गेलेल्या टर्फच्या तुलनेत कुपरेज मैदानाचे टर्फ उत्तम दर्जाचे आहे. आमचा संघ पूर्णपणे तंदुरुस्त असून मुंबईविरुद्ध नक्कीच आम्ही यशस्वी कामगिरी करू. - अ‍ॅश्ले वेस्टवूड, बंगळुरू एफसी प्रशिक्षक