शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांनो, तुमचा पाठिंबा मोलाचा

By admin | Updated: May 26, 2015 01:49 IST

हा क्षण तुमच्यसोबत साजरा केल्याचा आनंद शब्दांत सांगू शकत नाही, असे भावनिक आभार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आयपीएल विजेतेपद पटकवल्यानंतर मुंबईकरांचे मानले.

सचिनने मानले आभार : मुंबई इंडियन्सचे जल्लोषात स्वागतमुंबई : नमस्कार मुंबई... तुमचा पाठिंब खुप मोलाचा होता.. त्याशिवाय आम्हाला यश मिळणे शक्य नव्हते. असे आनंदाचे क्षण फार कमी येतात, मात्र हा क्षण तुमच्यसोबत साजरा केल्याचा आनंद शब्दांत सांगू शकत नाही, असे भावनिक आभार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आयपीएल विजेतेपद पटकवल्यानंतर मुंबईकरांचे मानले.सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजल्यापासूनच वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटप्रेमींची गर्दी होत होती. कोणताही सामना नसताना वानखेडे स्टेडियमवर होणारी गर्दी पाहून सामान्य मुंबईकरांना देखील आश्चर्य वाटत होते. मात्र खरे कारण कळाल्यानंतर आपसूकच त्यांची पावले देखील वानखेडेच्या दिशेने वळाले. कारण यंदाच्या आयपीएल सत्राचे दिमाखदार विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडीयन्स संघाचे आगमन घरच्या मैदानावर होणार होते.रात्री ८ वाजून २४ मिनिटांनी टीम मुंबई इंडियन्स वानखेडे मैदानात उतरली ती सामना खेळण्यासाठी नाही तर अडखळत्या सुरुवातीनंतरही ज्या चाहत्यांनी साथ न सोडता प्रोत्साहन दिले त्यांचे आभार मानण्यासाठी आणि यावेळी आपल्या लाडक्या संघाला पाहताच उपस्थित चाहत्यांनी स्टेडियम दणाणून सोडले.तासभर चाललेल्या या सोहळ्यामध्ये मुंबईकरांनी मोठ्या उत्साहात आपल्या विजयी संघाचे दमदार स्वागत केले. सलग चार सामने गमावल्यानंतर क्वालिफायर गाठण्याची देखील शक्यता नसताना संघाने थेट विजेतेपदाला गवसणी घातल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. सर्वप्रथम संघाने संपुर्ण स्टेडियमवर फेरीमारुन मुंबईकरांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानले. यावेळी भज्जी, पोलाडसह साऱ्याच खेळाडूंनी स्टेडियम गाजवले. भज्जीने मी पंजाबीपेक्षा स्वत:ला मुंबईकर समजत असल्याचे सांगून मुंबईकरांना जिंकले.दरम्यान यावेळी सर्वाधिक जयघोष झाला तो सचिनचा. सचिनने देखील आपल्या चहत्यांचे मनापासून आभार मानताना विजेतेपदाचे सारे श्रेय चाहत्यांना दिले. विशेष म्हणजे सचिनने मराठीतून संवाद साधल्याने स्टेडियममध्ये जबरदस्त जोश दिसून आला. रात्री ९ वाजून ४ मिनिटांनी लहान मुलांच्या हस्ते ‘आयपीएल ट्रॉफी’ मैदानात आणली गेली.चाहत्यांचा पाठिंबा अप्रतिम होता. संघाची एकूण सुरुवात पाहता त्यांनी आमची साथ कधीच सोडली नाही. त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्हाल प्रोत्साहन मिळाले. या संपुर्ण सत्रात शालेय विद्यार्थ्यांना मुंबईच्या सामन्यासाठी निमंत्रित केले होते. तो क्षण अवर्णनिय आहे. त्यांचे शुभेच्छा देखील खुप मोलाचे होते.- नीता अंबानी ,मुंबई इंडियन्स संघमालकीणनिराशाजनक सुरुवातीनंतर मिळवलेली विजयी लय महत्त्वाची ठरली. यासाठी संघातील प्रत्येकाने खुप मेहनत घेतली. विशेष म्हणजे चाहत्यांनी आमच्यवरील विश्वास ढासळू दिला नाही. त्यामुळे हे विजेतेपद खास मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आहे.- रोहित शर्मा,कर्णधार