शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विजयी मार्गावर

By admin | Updated: February 6, 2016 03:12 IST

झारखंडचा पहिला डाव १७२ धावांत संपुष्टात आणून २४४ धावांची भक्कम आघाडी घेतल्यानंतर बलाढ्य मुंबईने दुसऱ्या डावात २४५ धावांची मजल मारून झारखंडला विजयासाठी ४९० धावांचे अशक्यप्राय आव्हान दिले.

मुंबई : झारखंडचा पहिला डाव १७२ धावांत संपुष्टात आणून २४४ धावांची भक्कम आघाडी घेतल्यानंतर बलाढ्य मुंबईने दुसऱ्या डावात २४५ धावांची मजल मारून झारखंडला विजयासाठी ४९० धावांचे अशक्यप्राय आव्हान दिले. या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना झारखंडने तिसऱ्या दिवसअखेर १ बाद २८ अशी सुरुवात केली. श्रेयश अय्यरने दुसऱ्या डावात शानदार ८१ धावांची खेळी केली.म्हैसूर येथे सुरू असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सुरुवातीलाच मुंबईने आवश्यक २ बळी घेत झारखंडला १७२ धावांत गुंडाळले. यानंतर मुंबईकरांनी दुसऱ्या डावाची आक्रमक सुरुवात करताना झारखंडवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमणाच्या नादात बळी गेल्याने मुंबईकरांचा डाव मर्यादित राहिला. पुन्हा एकदा श्रेयश अय्यरने शानदार खेळी करताना १०६ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ८१ धावांची खेळी केली. तर कर्णधार अभिषेक नायरने ७७ चेंडूंत ७ चौकार मारताना ४३ धावांची उपयुक्त खेळी केली. या दोघांच्या निर्णायक फटकेबाजीमुळे मुंबईला दुसऱ्या डावात दोनशेचा टप्पा गाठता आला. समर कद्री याने आपल्या फिरकीच्या जोरावर ६२ धावांत ५ खंदे फलंदाज बाद करताना मुंबईच्या धावसंख्येला वेसण घातली. तर राहुल शुक्ला आणि कौशल सिंग यांनी प्रत्येकी २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. दुसऱ्या डावात सावध सुरुवात करताना झारखंडने तिसऱ्या दिवसअखेर १ बाद २८ अशी सुरुवात केली. फिरकीपटू इक्बाल अब्दुल्लाने सलामीवीर आनंद सिंगचा बळी मिळवला. तत्पूर्वी ८ बाद १५० या धावसंख्येवरून सुरुवात करताना झारखंडचा डाव झटपट गुंडाळण्यात मुंबईकरांना यश आले. शार्दुल ठाकूरने झारखंडचे शेपूट जास्त वेळ वळवळणार नाही याची दखल घेत नाबाद फलंदाज कौशल सिंग व शेवटचा फलंदाज समर कद्री यांना बाद केले. ठाकूरने हेरवाडकर व अब्दुल्लाप्रमाणे ३ बळी घेत मुंबईसाठी मोलाची कामगिरी केली.संक्षिप्त धावफलक : मुंबई (पहिला डाव) : ११४.४ षटकांत सर्वबाद ४१६ धावा. झारखंड (पहिला डाव) : ७१.५ षटकांत सर्वबाद १७२ धावा (कौशल सिंग ४३, आनंद सिंग ३९; अखिल हेरवाडकर ३/२६, शार्दुल ठाकूर ३/३७, अब्दुल्ला ३/५०). मुंबई (दुसरा डाव) : ६३.१ षटकांत सर्वबाद २४५ धावा (श्रेयश अय्यर ८१, नायर ४३; समर कद्री ५/६५). झारखंड (दुसरा डाव) : १३ षटकांत १ बाद २८ (शिव गौतम खेळत आहे १२, आनंद सिंग १२, विराट सिंग खेळत आहे ४; इक्बाल अब्दुल्ला १/११)