शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विजयी लय राखण्यास प्रयत्नशील

By admin | Updated: April 16, 2017 03:37 IST

मागच्या सामन्यात विपरीत परिस्थितीत विजय नोंदविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला मुंबई गुजरातविरुद्ध आयपीएलमध्ये आज रविवारी विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे.

मुंबई : मागच्या सामन्यात विपरीत परिस्थितीत विजय नोंदविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला मुंबई गुजरातविरुद्ध आयपीएलमध्ये आज रविवारी विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे.गुजरातने पुणे संघावर ७ गड्यांनी विजय साजरा करीत विजयीपथावर पोहोचला. चार सामन्यांत सहा गुण मिळविणाऱ्या मुंबईला आघाडीच्या फलंदाजीची समस्या अद्याप भेडसावते आहे. पोलार्डने तारले नसते तर मुंबईला विजयी लक्ष्य गाठणे अशक्य होते. कर्णधार रोहित शर्मा हा गुगलीपुढे नांगी टाकतो. इम्रान ताहीर, राशिद खान आणि बद्री यांनी त्याला जाळ्यात ओढले आहे. रोहितने तिन्ही सामन्यांत दहापेक्षा कमीच धावा केल्या. मुंबईसाठी सकारात्मक बाब ठरली ती हार्दिक आणि कृणाल या पांड्या बंधूंची बहारदार खेळी. सामन्यात दोघांनीही योगदान दिले. आरसीबी तसेच हैदराबादविरुद्ध कृणालने मोक्याच्या क्षणी धावा ठोकल्या होत्या. गोलंदाजीत हरभजनसिंगने अनुुभव सिद्ध केला. मलिंगा गुजरातविरुद्ध यशस्वी ठरल्यास आक्रमण आणखी भक्कम होईल. गुजरात लायन्स ब्रेंडन मॅक्युलम आणि ड्वेन स्मिथ यांच्याकडून डावाचा प्रारंभ करू शकतो. कर्णधार सुरेश रैना सातत्याने धावा काढत आहे. अ‍ॅरोन फिंच यानेदेखील मोलाचे योगदान दिले. या चौघांच्या उपस्थितीत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. अ‍ॅन्ड्र्यू टाय याने हॅट्ट्रिक नोंदविल्याने गुजरातची गोलंदाजी बलाढ्य झाल्याचे चित्र निर्माण झाले. (वृत्तसंस्था)