शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

तर आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा मुंबई ठरणार पहिला संघ

By admin | Updated: May 21, 2017 18:28 IST

आज होणाऱ्या अंतिम लढतीत विजय मिळवल्यास मुंबई इंडियन्सच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद होणार आहे

ऑनलाइन लोकमत 
हैदराबाद, दि. 21 -   आयपीएल 10 च्या महाअंतिम लढतीस सुरुवात होण्यास आता काही तासांचाच अवधी उरला आहे. या लढतीसाठी मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स हे दोन्ही संघ कंबर कसून तयार झाले आहेत. गेल्या दहा वर्षात आयपीएलची अंतिम फेरी गाठण्याची मुंबईची ही चौथी वेळ आहे. तर दुसऱ्यांदा आयपीएलमध्ये खेळणाऱ्या पुणे सुपरजायंट्स संघाने पहिल्यांदाच आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे. आता आज होणाऱ्या अंतिम लढतीत विजय मिळवल्यास मुंबई इंडियन्सच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद होणार आहे.  
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने स्पर्धेत 100 विजयांची नोंद करणारा पहिला संघ बनण्याचा मान यावर्षी पटकावला होता. तसेच तीन वेळा अंतिम फेरीत खेळत दोन वेळा विजेतेपदाला गवसणी घालण्याचा मानही मुंबईने मिळवला आहे. आता आज रात्री पुण्याला चितपट करून आयपीएलच्या विजेतेपदावर कब्जा केल्यास तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणारा मुंबई हा आयपीएलमधील पहिला संघ ठरणार आहे. 
 
याआधी चेन्नई सुपरकिंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांनी प्रत्येकी दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलेले आहे. आता आज विजेतेपद पटकावल्यास  चेन्नई आणि कोलकात्याला मागे टाकण्याची संधी मुंबईकडे असेल.