शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई सुसाट...

By admin | Updated: April 23, 2017 03:06 IST

फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करण्यात आलेल्या अपयशानंतर गोलंदाजांनी भेदक मारा केल्याने मुंबई इंडियन्सने विजयाचा ‘षटकार’ नोंदवताना दिल्ली डेअरडेव्हिल्सचा १४ धावांनी

- रोहित नाईक,  मुंबई

फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करण्यात आलेल्या अपयशानंतर गोलंदाजांनी भेदक मारा केल्याने मुंबई इंडियन्सने विजयाचा ‘षटकार’ नोंदवताना दिल्ली डेअरडेव्हिल्सचा १४ धावांनी पराभव केला. यासह १२ गुणांची कमाई करताना मुंबईकरांनी गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ८ बाद १४२ अशी मजल मारली. या वेळी मुंबईचा विजयी अश्वमेध दिल्लीकर रोखणार, अशीच शक्यता होती. परंतु, गोलंदाजांनी ठराविक अंतराने बळी घेत दिल्लीकरांना १२८ धावांवर रोखले. मिशेल मॅक्लेनघनने २४ धावांत ३ बळी घेत दिल्लीच्या फलंदाजीला खिंडार पाडले. तसेच, यंदाच्या मोसमातील पहिला सामना खेळणाऱ्या मिशेल जॉन्सनने एक षटक निर्धाव टाकत दिल्लीकरांना जखडवून ठेवले.

जसप्रीत बुमराह (२), हार्दिक पांड्या (१) व हरभजन सिंग यांनीही दिल्लीवर जबरदस्त दडपण आणले. एक वेळ दिल्लीची सातव्या षटकात ६ बाद २४ धावा अशी केविलवाणी स्थिती होती. येथेच मुंबईचा विजय निश्चित झालेला. परंतु, पहिला आयपीएल सामना खेळत असलेल्या कागिसो रबाडाने (३९ चेंडूंत ४४) अष्टपैलू ख्रिस मॉरिससह (४१ चेंडंूत नाबाद ५२) ९१ धावांची भागीदारी करत दिल्लीच्या आशा कायम ठेवल्या होत्या. परंतु, बुमराहने १९ व्या षटकात रबाडाला बाद करून सामना पूर्णपणे मुंबईच्या बाजूने झुकवला. तत्पूर्वी, धावांचा पाठलाग करताना सलग पाच विजयांची नोंद केलेल्या मुंबई इंडियन्सने ८ बाद १४२ अशी मजल मारली. आक्रमक सुरुवात केल्यानंतर ठराविक अंतराने बळी गेल्याने मुंबईची तगडी फलंदाजी यावेळी अपयशी ठरली. जोस बटलर (२८) आणि किरॉन पोलार्ड (२६) यांच्या फटकेबाजीनंतर हार्दिक पांड्याने (२४) काही प्रमाणात आक्रमकता दाखवल्याने मुंबईला समाधानकारक मजल मारता आली. संक्षिप्त धावफलक :मुंबई इंडियन्स : २० षटकांत ८ बाद १४२ धावा (जोस बटलर २८, किरॉन पोलार्ड २६, हार्दिक पांड्या २४; अमित मिश्रा २/१८, पॅट कमिन्स २/२०.) वि. वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ७ बाद १२८ धावा (ख्रिस मॉरिस ५२*, कागिसो रबाडा ४४; मिशेल मॅक्लेनघन ३/२४, जसप्रीत बुमराह २/२१).