शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई इंडियन्सकडून आयपीएलची ट्रॉफी सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण

By admin | Updated: May 22, 2017 18:16 IST

अनंत अंबानी यांनी आज सकाळी आयपीएलच्या ट्रॉफीसह मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरास भेट देत आयपीएलची ट्रॉफी बाप्पांच्या चरणी

ऑनलाइन लोकमत
मुंबई,  दि. 22 - थरारक लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंट्सला नमवून तिसऱ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर कब्जा करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या गोटात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. धमाल, मस्ती आणि सेलिब्रेशन करतानाच मुंबई इंडियन्सने आपल्या आस्थेचे दर्शन घडवले आहे. मुंबई इंडियन्सचे फ्रॅन्चायझी अनंत अंबानी यांनी आज सकाळी आयपीएलच्या ट्रॉफीसह मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरास भेट देत आयपीएलची ट्रॉफी बाप्पांच्या चरणी अर्पण केली. 
 
 काल झालेल्या आयपीएलच्या अंतिम लढतीत अखेर मुंबईकर पुण्याला भारी पडले होते. माफक धावसंख्येचा बचाव करताना गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंट्सला अवघ्या एका धावेने पराभूत करत आयपीएल 10 च्या विजेतेपदावर कब्जा केला होता.  मुंबईचे आयपीएलमधील हे तिसरे विजेतेपद ठरले. त्याबरोबरच आयपीएलमध्ये तीन विजेतेपदे पटकावणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला. 
 
मुंबईने दिलेल्या 130 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना पुण्याला 20 षटकांत 128 धावांपर्यंत मजल मारता आली होती. एकापेक्षा एक तगडे फलंदाज दिमतीला असूनही पुण्याचा संघ आयपीएलच्या विजेतेपदापासून अवघ्या एका धावेने वंचित राहिला.