शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई इंडियन्सने लढवय्या बाणा दाखविला

By admin | Updated: April 16, 2017 03:38 IST

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतरही मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लढवय्या बाणा दाखवित विजय साकारला.

- सुनील गावसकर लिहितात...चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतरही मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लढवय्या बाणा दाखवित विजय साकारला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी गेल, कोहली आणि डिव्हीलियर्स यांच्यासारख्या दिग्गज फलंदाजांचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्सचा डाव माफक धावसंख्येत रोखण्याचा पराक्रम केला. पण, त्यानंतर सॅम्युअल बद्रीने हॅट््ट्रिक नोंदवित मुंबई संघाला दडपणाखाली आणले होते. टी-२० क्रिकेटमध्ये संघ कुठलीही अनपेक्षित चाल खेळण्याचा प्रयत्न करतात. मुंबई इंडियन्सने मॅक्लेनघनला बढती दिली, पण त्यांची ही योजना सपशेल अपयशी ठरली. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. रोहित शर्मा भारतीय संघातर्फे टी-२० आणि वन-डे क्रिकेटमध्ये सलामीला खेळतो, पण कुठल्यातरी विचित्र कारणामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तो मधल्या फळीत खेळत आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला अपेक्षित सुरुवात मिळू शकलेली नाही. मुंबई इंडियन्सने जसे हरभजनला खेळविण्याचा निर्णय घेतला तसा कर्णधाराला सलामीला पाठविण्याचा निर्णय घ्यायला हवा. लेग स्पिनरविरुद्ध रोहितची अपेक्षित कामगिरी होत नसल्यामुळे तो सलामीला खेळला, तर त्याला फटकेबाजीची संधी मिळण्याची शक्यता आहे. लेग स्पिनरविरुद्ध फलंदाजी करताना त्याला चेंडूपर्यंत पोहोचावे लागते, पण सलामीला खेळला तर वेगवान गोलंदाजांचे चेंडू बॅटवर येतात आणि अपेक्षित फटके खेळण्याची संधी असते. पोलार्डने महत्त्वाची खेळी करीत विजय साकारला. त्याने कुणाल पांड्याचे साथीने आक्रमक फलंदाजी करीत संघावरील संकट दूर केले. लक्ष्य मोठे नसले, तरी पुन्हा एकदा बँगलोर संघ बचाव करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे गोलंदाजांना फलंदाजांकडे अंगुलीनिर्देश करण्याची संधी आहे. मुंबई संघ कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक असेल. मुंबई संघाला यानंतर पहिल्या विजयामुळे मनोधैर्य उंचावलेल्या गुजरात संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. गुजरात संघही गोलंदाजीमध्ये संघर्ष करीत असल्याचे दिसून येत आहे, पण टायच्या समावेशामुळे त्यांच्या गोलंदाजीमध्ये विविधता आली आहे.विजयाने सुरुवात करणारा पुणे संघ संघर्ष करीत आहे. पुणे संघाची भिस्त स्मिथ व स्टोक्सच्या कामगिरीवर अवलंबून आहे. अंतिम षटकांमध्ये त्यांना धावगती वाढविण्यात अपयश येत आहे. धोनीही फॉर्मात नसल्यामुळे पुणे संघाला अपेक्षित धावसंख्या उभारता आलेली नाही. ड्वेन स्मिथ व मॅक्युलम आक्रमक फलंदाजी करीत असताना स्टोक्स व ठाकूर यांच्या गोलंदाजीमुळे पुणे संघाचा नक्कीच हिरमोड झाला असेल. रविवारी चाहत्यांना पुन्हा एकदा रंगतदार लढती बघण्याची संधी मिळणार आहे. (पीएमजी)