शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई इंडियन्सला पराभवांची परतफेड करण्याची संधी

By admin | Updated: May 21, 2017 01:09 IST

यंदाच्या सत्रात मुंबई इंडियन्सने अद्याप पुणे सुपरजायंटवर विजय नोंदविलेला नाही. दोनदा साखळी लढतींमध्ये आणि एकदा प्ले आॅफमध्ये उभय संघ लढले तेव्हा पुण्यानेच बाजी मारली.

- रवी शास्त्री लिहितात...यंदाच्या सत्रात मुंबई इंडियन्सने अद्याप पुणे सुपरजायंटवर विजय नोंदविलेला नाही. दोनदा साखळी लढतींमध्ये आणि एकदा प्ले आॅफमध्ये उभय संघ लढले तेव्हा पुण्यानेच बाजी मारली. योगायागोने पुन्हा एकदा दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. मुंबईला मागील सर्व पराभवांची परतफेड करण्याची संधी असेल.मागील सर्वच सामने एकतर्फी नव्हते. पहिल्या सामन्यात स्टीव्ह स्मिथने झुंजार फटकेबाजी केली. प्ले आॅफमध्ये धोनीने सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत दोन षटकांत सामना फिरविला. खरे तर एका खेळाडूने कमाल करीत मुंबईला पाणी पाजले होते. पुणे संघाकडे असलेल्या या ताकदीचा अडथळा आज रात्री येऊ नये, याची मुंबई संघ काळजी घेणार आहे. बेन स्टोक्स आणि इम्रान ताहिर पुणे संघात नाहीत, याबद्दल मुंबई संघ खूश असेल. स्टोक्स सर्वांत महागडा खेळाडू का आहे, हे त्याने कामगिरीद्वारे दाखवून दिले. आणीबाणीच्या वेळी तो सर्वांत पुढे राहिला. ताहिरनेदेखील मोक्याच्या क्षणी बळी घेतले. या दोघांची उणीव पुणे संघाला भासणार आहे. या दोघांच्या अनुपस्थितीचा काही फरक जाणवणार नाही, असे हा संघ म्हणूच शकणार नाही. मुंबईने मागच्या आठवड्यात दोन महत्त्वाचे बदल केले. अंबाती रायुडू आणि मिशेल जॉन्सन यांना ब्रेक देण्यात आला होता. दुसरीकडे लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह यांच्या चेंडूवर फटकेबाजी करणे कठीण आहे. दीर्घकालीन लीगच्या अखेरीस आता कमी धावसंख्येचे सामने पाहायला मिळतात. अशा वेळी खेळाडूंचा फॉर्म टिकून राहावा, अशीच व्यवस्थापनाची मनोमन इच्छा असेल. मलिंगा आणि बुमराह यांच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष आहे. या योद्ध्यांनी प्रत्येकाला पाणी पाजले आहे. अंतिम सामना त्यांच्या कामगिरीमुळेच गाजावा, असे अनेकांना वाटत असावे. अखेर या लढतीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. (टीसीएम)