शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बलाढ्य मुंबई इंडियन्स संघाचे डोळे उघडले!

By admin | Updated: April 14, 2017 01:51 IST

मुंबई इंडियन्सने कात टाकलेली दिसते. ही झकास सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या सामन्यातील पराभवामुळे डोळे उघडलेच शिवाय नितीश राणासारखा नवा स्टार गवसला.

- सुनील गावसकर लिहितात...

मुंबई इंडियन्सने कात टाकलेली दिसते. ही झकास सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या सामन्यातील पराभवामुळे डोळे उघडलेच शिवाय नितीश राणासारखा नवा स्टार गवसला. हरभजनसारख्या अनुभवी गोलंदाजाला खेळवून संघाने गोलंदाजीत समतोल साधला आहे. काल हैदराबादविरुद्ध हरभजनसोबतच जसप्रीत बुमराहचे यॉर्कर गाजले. मलिंगाने देखील चांगला मारा केला. अन्यथा डावाच्या अखेरच्या टप्प्यातील खेळ मुंबईला आणखी एक पराभव देऊन गेला असता.मुंबईचा सामना आता आरसीबीविरुद्ध आहे. प्रतिस्पर्धी संघाचे नेतृत्व विराट कोहलीने केल्यास तो खरोखरच फिट आहे का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. या लढतीदरम्यान हरभजन, मलिंगा आणि बुमराहविरुद्ध ख्रिस गेल, डिव्हिलियर्स आणि विराट असे द्वंद्व रंगणार! चाहत्यांसाठी हे विलोभनीय दृश्य असेल तर मार्केटिंगसाठीही चेंडूविरुद्ध बॅट हे चित्र भव्य असेच राहील.आरसीबीच्या गोलंदाजीत बऱ्याच समस्या आहेत. गेल, डिव्हिलियर्स आणि कोहलीसारखे खेळाडू असल्यानंतरही हा संघ विरोधी संघांवर वचक ठेवण्यात अपयशी ठरताना दिसतो. २०० धावा फळ्यावर लावल्याशिवाय आरसीबीला बचाव करण्यात अडथळा येतो. त्यामुळेच त्यांचे अनेक विजय धावांचा पाठलाग करून साकार झालेले दिसतात.आजचा दुसरा सामनादेखील फारच प्रेक्षणीय असेल. मागच्या सत्रात तिसऱ्या स्थानी राहिलेला गुजरात संघ अद्याप ‘क्लिक’ झालेला नाही. या संघाला फलंदाजीसोबतच गोलंदाजीच्या समस्येने ग्रासले आहे. दुसरीकडे पुण्याला फॉर्ममध्ये असलेला कर्णधार स्टीव्ह स्मिथचा मोठा आधार आहे. गुजरातविरुद्ध तो मैदानात असेल. तो धावा काढत असल्याने धावसंख्येला आकार मिळत आहे. सुरुवातीचे सामने सुरू असले तरी अनेक संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यात यशस्वी ठरताना दिसत आहेत. स्पर्धा जसजसी पुढे सरकेल तसतसे दडपण वाढेल. संघ देखील फलंदाजी-गोलंदाजीचे संतुलन साधण्यावर भर देतील. बाद फेरीत नाणेफेकीचा कौलही निर्णायक ठरणार आहे कारण जिंकणारा कर्णधार आधी क्षेत्ररक्षण करण्याचाच प्रयत्न करणार आहे. (पीएमजी)