मुंबईला सर्वसाधारण विजेतेपद
By admin | Updated: June 2, 2014 08:55 IST
पुणे उपविजेता : राज्य ज्युनिअर जलतरण स्पर्धेचा समारोप
मुंबईला सर्वसाधारण विजेतेपद
पुणे उपविजेता : राज्य ज्युनिअर जलतरण स्पर्धेचा समारोपनाशिक : येथे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या राज्य ज्युनिअर जलतरण स्पर्धेमध्ये मंुबईच्या जलतरणपटूंनी पहिल्या दिवसापासून निर्विवाद वर्चस्व राखत सर्वसाधारण विजेतेपदावर नाव कोरले, तर पुणे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यजमान नाशिक २३ पदकांसह चौथ्या स्थानी राहिले. नाशिकरोडच्या राजमाता जिजाऊ जलतरण तलाव येथे राज्यस्तरीय ज्युनिअर जलतरण स्पर्धेचा आज पारितोषिक वितरणाने समारोप झाला. यावेळी विजेत्यांना उपमहापौर सतीश कुलकर्णी, नाशिकरोड प्रभाग सभापती कोमल मेहरोलिया, गटनेते संभाजी मोरुस्कर, नगरसेवक कन्हैया साळवे, किशोर वैद्य, क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटनेचे जे. एम. पवार, जितेंद्र पाटील, आबा देशमुख, विनय चंद्रात्रे, माया जगताप, अनिल सोनकांबळे, राजू पालकर, अविनाश खैरनार, शंकर मादगुंडी आदि उपस्थित होते. पदतालिका :जिल्हासुवर्णरौप्यकांस्यएकूणमंुबई७९६०४७१८६पुणे२४३४३१८९ठाणे१०१११२३३नाशिक ७४१२२२३मंुबईचेच वर्चस्वज्युनिअर गटाच्या विविध वयोगटांतील स्पर्धांमध्ये मंुबईच्याच जलतरणपटूंनी वर्चस्व राखले. दहा वर्षांआतील गटात मंुबईच्या आरमान सिक्का, तर मुलींच्या गटात एका छात्रा; १२ वर्षांआतील मुलांच्या गटात मुंबईच्या विनीत माने, तर मुलींच्या गटात साना गया; १४ वर्षांआतील मुलांच्या गटात मंुबईच्या आर्यन माखिजा, मुलींच्या गटात रायना सालदाणा, तर १७ वर्षांआतील मुलांच्या गटात मंुबईच्याच इशान जाफरने, तर मुलींच्या गटात पुण्याच्या युगा बिरनाले यांनी उत्कृ ष्ट जलतरणपटूचा किताब पटकावला. डायव्हिंगमध्ये सोलापूरची आघाडीडायव्िंहगच्या १ मी. स्प्रिंग बोर्ड मुलांच्या गटात अथर्व (सोलापूर), रमेश ढाणे (नाशिक), ईश्वर गडाम (सोलापूर), तर मुलींच्या गटात साक्षी केंदळे (सोलापूर), फाल्गुनी देशपांडे (सोलापूर), इव्हाना पिंटो (मंुबई) यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक पटकावले. नचिकेतचे पुन्हा सुवर्णसदरील जलतरण स्पर्धेमध्ये नाशिकच्या नचिकेत बुझरूक याने आजही सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेतील त्याचे हे पाचवे सुवर्णपदक आहे. त्याने आज १०० मी. फ्री स्टाईलमध्ये सुवर्णपदक घेतले. मुलींमध्ये माणिक चर्तुभूज हिने १५०० मी. फ्री स्टाईलमध्ये सुवर्ण, तर सिद्धी कोतवाल हिने कांस्यपदक पटकावले. मुलांमध्ये १५०० मीटर फ्री स्टाईलमध्ये अनुज कित्तुरे, जितेश शास्त्री यांनी कांस्यपदक पटकावले. स्पर्धेचा निकाल : विजेत्यांची नावे सुवर्ण, रौप्य व कांस्य या क्रमाने...१०० मी. फ्री स्टाईल मुले : नचिकेत बुझरूक (नाशिक), दिव व्होरा (मंुबई), मिहिर आंब्रे (पुणे).१०० मी. फ्री स्टाईल मुली : रायना सालदाणा (मुंबई), मल्लिका बैखेरीकर (मुंबई), साक्षी शेी (पुणे).५० मी. फ्री स्टाईल मुले : विनीत माने (मंुबई), हिव शेी (मंुबई), अमिर असारीवाला (मंुबई).५० मी. फ्री स्टाईल मुली : अनन्या मेहेरे (मंुबई), हिताशी मेहता (मंुबई), पायल श्रीराव (ठाणे).२०० मी. वैयक्तिक मिडले मुले : स्वेजल मानकर (पुणे), हर्षल वखारिया (पुणे), जोशन स्मिथ (मुंबई).२०० मी. वैयक्तिक मिडले मुली : आरती पाटील (मुंबई), अंतरा अग्रवाल (मंुबई), व्ही. जयश्री (ठाणे).२०० मी. वैयक्तिक मिडले मुले : वेदांत खांडपारकर (मंुबई), नील रॉय (मंुबई), रायन पिन्टो (मंुबई).२०० मी. वैयक्तिक मिडले मुली : प्रोतिती सिन्हा (मंुबई), मुस्कान तोलाणी (मंुबई), निकिता राणे (मंुबई).२०० मी. वैयक्तिक मिडले मुले : विनीत माने (मंुबई), अवधूत परुळेकर (कोल्हापूर), साहील गंगोटे (पुणे).२०० मी. वैयक्तिक मिडले मुली : केनिशा गुप्ता (मंुबई), सई पाटील (मुंबई), रिद्धी हागवणे (पुणे).(जोड आहे.......)