शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक अंतिम सामना पाहणार 32 कोटींहून अधिक प्रेक्षक, बनणार नवा रेकॉर्ड

By admin | Updated: June 18, 2017 13:19 IST

भारत-पाकिस्तानच्या आजच्या आयसीसी चॅम्पियन्सच्या अंतिम सामन्याची राजकीय वर्तुळापासून क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

ऑनलाइन लोकमत ओव्हल, दि. 18 - भारत-पाकिस्तानच्या आजच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याची राजकीय वर्तुळापासून क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या दोन प्रतिस्पर्धी देशांमधला अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांचीही लक्षणीय उपस्थिती दिसून येईल. भारत-पाक महामुकाबला लंडनच्या थेट ओव्हल ग्राऊंडवर जाऊन पाहणा-या प्रेक्षकांशिवाय इतरही टीव्हीच्या माध्यमातून हा सामना पाहतील. जगभरातील क्रिकेटचे चाहते आज टीव्हीसमोरच बसतील. आज पूर्ण जगभरात जवळपास 32 कोटी 40 लाख प्रेक्षक आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा सामना पाहतील, असा अंदाज आयसीसी(इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिल)नं वर्तवला आहे. जर असे झाल्यास हा क्रिकेट इतिहासातला सर्वात जास्त पाहण्यात आलेला महामुकाबला ठरेल. खरं तर 2011मधला वर्ल्ड कप अंतिम सामना सर्वाधिक पाहण्यात आला होता. तो सामना जवळपास 55 कोटी 80 लाख लोकांनी पाहिला होता. त्याच वेळी दुस-या स्थानावर भारत आणि पाकिस्तानदरम्यान खेळण्यात आलेला वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीचा सामना होता. तो सामना 49 कोटी 50 लाख प्रेक्षकांनी पाहिला होता. 

तसेच भारत-पाकिस्तानदरम्यानच्या वर्ल्ड कप 2015चा सामना 31 कोटी 30 लाख प्रेक्षकांनी पाहिला होता. तसेच भारत आणि श्रीलंका या संघांदरम्यान झालेला वर्ल्ड कप 2011चा सामना 30 कोटी जनतेनं पाहिला होता. आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात होत असलेला अंतिम सामना टीव्हीवरील प्रेक्षक संख्येचे इतर सर्व रेकॉर्ड तोडतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.