शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सोमवारी संघनिवड

By admin | Updated: June 27, 2015 00:48 IST

पुढील महिन्यात आयोजित भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट कायम असल्यामुळे अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

मुंबई : पुढील महिन्यात आयोजित भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट कायम असल्यामुळे अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दुसरीकडे, बीसीसीआयने राष्ट्रीय निवडकर्त्यांना २९ जून रोजी नवी दिल्लीत संघ निवडण्याच्या सूचना दिल्या. सिनियर खेळाडूंच्या उपलब्धतेची सूचना राष्ट्रीय निवडकर्त्यांना नव्हती. मीडियातील वृत्तानुसार अनेक खेळाडूंनी या दौऱ्यातून सूट मागितल्याचे कळते. मीडियातील वृत्तास दुजोरा मिळावा यासाठी निवड समितीचे प्रमुख संदीप पाटील म्हणाले, ‘‘आतापर्यंत तरी कुठल्याही खेळाडूंनी सूट मागण्याविषयी संपर्क साधलेला नाही.’’ संघनिवडीसाठी सोमवारी नवी दिल्लीत बैठक होणार असल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला. गेल्या वर्षभरात सातत्याने क्रिकेट खेळून वरिष्ठ खेळाडू थकले आहेत. त्यांना विश्रांती हवी असल्याने त्यांची जागा ब दर्जाच्या संघातील खेळाडू घेतील, असे मानले जाते. एखाद्या खेळाडूला दौरा करायचा नसेल, तर तो खेळाडू बीसीसीआय सचिवांना कळवितो. सचिव ही माहिती पाच सदस्यांच्या समितीकडे पाठवितात. ठाकूर हे सध्या आयसीसीच्या बैठकीसाठी बार्बाडोसला गेले आहेत. त्यांच्याकडे एखाद्या खेळाडूने सूट मागितली काय, याची माहिती मिळू शकली नाही. प्रसारण हक्क मुद्द्यामुळे आधीच हा दौरा अडचणीत आला. झी नेटवर्क समूहाच्या अधिकारात असलेल्या टेन स्पोर्ट्सवर प्रसारण करण्यास बीसीसीआय तयार नाही. झिम्बाब्वे क्रिकेट संघाच्या अधिकारात होणाऱ्या कुठल्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांंचे प्रसारण करण्याचा अधिकार झी नेटवर्ककडे आहेत. दुसरीकडे, असेही वृत्त आहे, की हा दौरा पुढील दोन वर्षांसाठी स्थगित केला जाऊ शकतो. पण, बीसीसीआय किंवा आयसीसी बोर्डाने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.