शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मोमीनूल, तमीमची अर्धशतके

By admin | Updated: January 13, 2017 01:22 IST

मोमीनूल हक आणि तमीम इक्बाल यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर बांगला देशने न्यूझीलंड विरुद्ध

वेलिंग्टन : मोमीनूल हक आणि तमीम इक्बाल यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर बांगला देशने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययानंतरही ठोस सुरुवात करीत ३ बाद १५४ अशी वाटचाल केली. दोनदा पावसाने हजेरी लावली. अंधुक सूर्यप्रकाशामुळे केवळ ४०.२ षटकांचाच खेळ होऊ शकला. मोमीनूल ६४ तसेच साकीब उल हसन ५ धावांवर नाबाद आहेत. साकीबला चार धावांवर जीवदान मिळाले. सलामीवीर तमीमने ५६ धावा ठोकल्या. ढगाळ वातावरण, वेगवान वारे आणि हिरव्यागार मैदानावर बोचऱ्या थंडीत गोलंदाजांसाठी पोषक वातावरण होते. पण बांगला देशच्या फलंदाजांनी हे आव्हान लीलया पेलले. तमीमने ५० चेंडूत ९ चौकारांसह ५६ तर मोमीनूलने ११० चेंडूत १० चौकार व एका षटकारासह ६४ धावा केल्या. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून बांगला देशला फलंदाजीची संधी दिली. टिम साऊदीने चौथ्याच षटकात इमरुल कायेस(१)ला ट्रेंट बोल्टकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर पावसामुळे खेळ थांबला.खेळ सुरू झाला तेव्हा बोल्टने पहिल्याच षटकात तमीमला पायचित केले. न्यूझीलंड विरुद्ध गेल्या चार डावांत दोन शतके ठोकणाऱ्या मोमीनूलला सुरुवातीला पकड निर्माण करता आली नव्हती. लगेच पावसाने पुन्हा हजेरी लावली.पाऊस थांबताच खेळ सुरू झाला तेव्हा मोमीनूल फटके मारताना दिसला. त्याने मोहमदुल्लाह(२६)याच्यासोबत तिसऱ्या गड्यासाठी ८५ धावांची भागीदारी केली. नील व्हॅगनरने मोहमदुल्लाहला यष्टिरक्षक बीजे वॉटलिंगकडे झेल देण्यास बाध्य केले. पुढील दोन दिवस हवामान चांगले राहील अशी शक्यता वर्तविण्यात आली असून, रविवारी मात्र पाऊस येऊ शकतो.(वृत्तसंस्था)