मुंबई : कोणाच्या ध्यानीमनीही नसताना 7 गुणांसह द्वितीय क्रमांकावर असलेल्या मिथिल आजगावकरने अंतिम फेरीमध्ये आंतरराष्ट्रीय व संभाव्य विजेत्या विक्रमादित्य कुलकर्णीला पराभवाचा धक्का देत फ्रीडम चषक खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अस्तित्व संस्कार प्रबोधिनी आणि किंग्स चेक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने अयोजित या स्पर्धेत विक्रमादित्यने सुरुवातीपासून विजयी धडाका लावताना 7.5 गुणांसह अग्रस्थान मिळवले होते. स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याला विजेतेपद निश्चित करण्यासाठी बरोबरीदेखील पुरेशी होती. मात्र मिथिलने विक्रमादित्यला नमवत विजेतेपद पटकावले.