शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मिसबाहचे शतक, पाक ६ बाद २८२

By admin | Updated: July 15, 2016 02:19 IST

इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस व्होक्सच्या (४-४५) अचूक माऱ्यानंतरही गुरुवारपासून लॉर्डस् येथे सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल-हकने

लंडन : इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस व्होक्सच्या (४-४५) अचूक माऱ्यानंतरही गुरुवारपासून लॉर्डस् येथे सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल-हकने (नाबाद ११०) शतकी खेळी करीत संघाचा डाव सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी पाकिस्तानने ६ बाद २८२ धावांची मजल मारली होती. पाकच्या डावात असद शफिकचे (७३) योगदानही उल्लेखनीय ठरले. वोक्सने ४ गडी बाद केले तर बॉल व ब्रॉड यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. दिवसअखेर शतकवीर मिसबाह ११० धावांवर नाबाद होता. त्याआधी वोक्सने दोन्ही सलामीवीर शान मसूद (७) आणि मोहम्मद हफीज (४0) यांना तंबूत धाडले. अझहर अली (७) व युनिस खान (३३) यांना मोठी खेळी करता आली नाही.इंग्लंडला पहिला बळी मिळविण्यासाठी १३ व्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. वोक्सने त्याच्या सातव्याच चेंडूंवर संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याचा उसळता चेंडू डावखुरा फलंदाज मसूदच्या बॅटीला चाटून यष्टिरक्षक जॉनी बेयरस्टॉ याच्या ग्लोव्हजमध्ये विसावला.हफीज आणि मसूद यांनी सलामीसाठी ३८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर वोक्सने हफीजलादेखील यष्टिपाठीमागे झेलबाद केले. हफीजने त्याच्या खेळीत आठ चौकार मारले. त्याआधी पाकिस्तानने वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर याला अंतिम अकरा जणांत स्थान दिले. आमीर लॉर्डस् येथेच २0१0 साली इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. त्यामुळे त्याच्यावर पाच वर्षांची बंदी लादण्यात आली होती.(वृत्तसंस्था)