अर्जुन, द्रोणाचार्यवर क्रीडा मंत्रालयाचे शिक्कामोर्तब
By admin | Updated: August 21, 2014 23:53 IST
नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने यंदा उद्भवलेल्या तमाम वाद-विवादांकडे दुर्लक्ष करीत निवड समितीने सुचविलेल्या अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कारांवर गुरुवारी शिक्कामोर्तब केले.राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात होणार आहे. यंदा १५ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, पाच प्रशिक्षकांना द्रोणाचार्य, तीन खेळाडूंना ध्यानचंद, तसेच चार संस्थांना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार ...
अर्जुन, द्रोणाचार्यवर क्रीडा मंत्रालयाचे शिक्कामोर्तब
नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने यंदा उद्भवलेल्या तमाम वाद-विवादांकडे दुर्लक्ष करीत निवड समितीने सुचविलेल्या अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कारांवर गुरुवारी शिक्कामोर्तब केले.राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात होणार आहे. यंदा १५ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, पाच प्रशिक्षकांना द्रोणाचार्य, तीन खेळाडूंना ध्यानचंद, तसेच चार संस्थांना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यंदा कुणाही खेळाडूला प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न देण्यात येणार नाही. निवड समितीने या पुरस्कारासाठी एकाही खेळाडूला योग्य समजले नव्हते. अर्जुन, द्रोणाचार्य व ध्यानचंद पुरस्कारामध्ये प्रतिमा, प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपयांची रोख रक्कम दिली जाईल. राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कारासाठी ट्रॉफी दिली जाईल. माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील पुरस्कार निवड समितीने अर्जुन पुरस्कार विजेत्यांची निवड केली. माजी हॉकी कर्णधार अजितपालसिंग यांच्या समितीने द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांची, तसेच क्रीडा सचिव अजित शरण यांच्या नेतृत्वाखालील समितीने ध्यानचंद आणि राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कारांची निवड केली होती.(वृत्तसंस्था)पुरस्कार यादी : अखिलेश वर्मा (तीरंदाजी), टिंटू लुका (ॲथलेटिक्स), एच. एन. गिरिशा (पॅरालिम्पिक:, व्ही. दीजू (बॅडमिंटन), गीतू एन. जोस (बास्केटबाल), जय भगवान (बॉक्सिंग) रविचंद्रन आश्विन (क्रिकेट), अर्निबान लाहिरी (गोल्फ), ममता पुजारी (कबड्डी), साजी थामस (नौकायान), हीना सिद्धू (नेमबाजी), अनाका अलानकामोनी (स्क्वाश), टाम जोसफ (व्हॉलीबॉल), रेनूबाला चानू (वेटलिफ्टिंग), सुनील राणा (कुस्ती). द्रोणाचार्य पुरस्कार : महावीर प्रसाद (कुस्ती), एन. लिंगप्पा (ॲथलेटिक्स), जी. मनोहरन (बॉक्सिंग), गुरचरण सिंह गोगी (ज्युदो), जोस जेकब (नौकायान) ध्यानचंद पुरस्कार : गुरमेल सिंह (हॉकी), के. पी. ठक्कर (जतरलण), झिशान अली (टेनिस).