शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

मिनी आयपीएलची योजना सध्या गुंडाळली- बीसीसीआय

By admin | Updated: September 1, 2016 20:07 IST

अमेरिकेत मिनी आयपीएल करण्याची योजना सध्यातरी गुंडाळण्यात आल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी दिली.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 1 - अमेरिकेत मिनी आयपीएल करण्याची योजना सध्यातरी गुंडाळण्यात आल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी दिली. अमेरिकेत क्रिकेट लोकप्रिय करण्यासाठी मागच्या आठवड्यात भारत-विंडीजयांच्यात दोन टी-२० सामने आयोजित करण्यात आले. याशिवाय तेथे मिनी आयपीएल करण्याची योजना होती. पण बोर्डाने ही योजना सध्या थंडबस्त्यात ठेवली आहे.ही योजना सध्या का यशस्वी होऊ शकणार नाही, हे सांगताना ठाकूर म्हणाले, मिनी आयपीएल करण्यात सर्वांत मोठा अडसर वेळेचा आहे. याशिवाय दोन्ही देशांमधील भौगोलिक अंतरही लांब आहे. भारतात आयपीएल सामना सायंकाळी७ ते रात्री ११ या वेळेत आटोपण्यात येतो. त्यामुळे अमेरिकेत भारताच्या दृष्टीने सोयीचे होईल, अशा जागी सामने करावे लागतील. भारतात या सामन्यांचे प्रक्षेपण रात्री होणे फारच गरजेचे आहे.भारतीय खेळाडू देशाबाहेर जरी खेळणार असतील तरी भारतीय प्रेक्षक बीसीसीआयसाठी मोलाचे आहेत. कुठल्याही प्रकारे त्यांची नाराजी ओढवून घेऊ शकत नाही. मिनी आयपीएल करण्याआधी भारताच्या दृष्टीने सोयीचे ठरेल अशा अमेरिकेतील कुठल्या भागात सामन्यांचे आयोजन होऊ शकते याची चाचपणी करावी लागेल. बीसीसीआयची आयपीएल भारताबाहेर करण्याची सध्यातरी कुठलीही योजना नाही. आम्ही देशाबाहेर आयपीएल आयोजित करण्याचा विचार करू शकत नाही. पण यासाठी अनेक पर्याय असून त्यावर काही महिन्यात विचार केला जाऊ शकतो, असे ठाकूर यांचे मत आहे.बीसीसीआयने आधी जून महिन्यात विदेशात मिनी आयपीएल आयोजित करण्याची योजना आखली होती. त्यानंतर ठाकूर यांनी देखील बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन सप्टेंबरमध्ये करू शकेल, असे सांगितले होते. पण आज त्यांनी असा कुठलाहीविचार सध्यातरी डोक्यात नसल्याचे सांगून काही काळासाठी मिनी आयपीएलची चर्चा बंद केली आहे.(वृत्तसंस्था)