शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मानसिकदृष्ट्या दोन्ही संघ बरोबरीत

By admin | Updated: March 21, 2017 01:05 IST

रांचीमध्ये झालेला तिसरा कसोटी सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. शेवटचा दिवस उजाडला, तेव्हा भारत हा सामना जिंकेल असे वाटत होते.

रांचीमध्ये झालेला तिसरा कसोटी सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. शेवटचा दिवस उजाडला, तेव्हा भारत हा सामना जिंकेल असे वाटत होते. कारण, चौथा दिवस संपता संपता भारताने आॅस्ट्रेलियाचे दोन गडी बाद करुन, त्यांच्यावर थोडे दडपण आणले होते. त्यात सकाळी पहिल्या सत्रात भारतासाठी या मालिकेत सर्वांत मोठी डोकेदुखी ठरलेला स्टिव्ह स्मिथ आणि सलामीवीर रेनशॉ हे दोघेही लवकर बाद झाले, त्यामुळे भारतीय गोलंदाज आज जलवा दाखवणार असे वाटत होते, परंतु तसे झाले नाही. शॉन मार्श आणि पीटर हॅँड्सकोंब यांच्यात झालेल्या जबरदस्त भागीदारीमुळे भारताला विजयापासून वंचित राहावे लागले. हँड्सकोब, रेनशॉ, कमिन्स यासारखे युवा खेळाडू हे भारत दौऱ्यातून आॅस्ट्रेलियाला मिळालेली देणगी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करुन ते संघात आपले स्थान पक्के करीत आहेत. आॅस्ट्रेलियाने हा सामना अनिर्णीत ठेवून मोठे यश तर मिळवले आहेच, शिवाय बंगलोर कसोटीतील विजयामुळे भारताला जी मानसिक आघाडी मिळाली होती, ती आता बरोबरीत आली आहे. त्यामुळे चौथ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी दोन्ही संघ जेव्हा धरमशाला येथे जातील तेव्हा दोघेही समान पातळीवर असतील.कसोटी अनिर्णीत राहिल्यामुळे भारतीय चमू निराश झाला असला, तरी या सामन्यातून भारताला बरेच काही गवसले आहे. चेतेश्वर पुजारा हा खेळाडू किती महान आहे, याची प्रचिती या सामन्यातून आली. दबावाच्या वेळी तो मैदानात तंबू ठोकून उभा राहिला नसता, तर आॅस्ट्रेलियाला मोठी आघाडी मिळाली असती, अशी परिस्थिती होती. परंतु, त्याने आपल्या फलंदाजीने आॅस्ट्रेलियाची धावसंख्या मागे टाकून भारताला दीडशेच्यावर आघाडी मिळवून दिली. यावरुन तो किती मोठा खेळाडू आहे त्याची कल्पना येते. याशिवाय वृद्धिमान साहा हा सुध्दा या मालिकेतून भरवशाचा फलंदाज म्हणून उदयास येत आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या मोठ्या खेळाडूची जागा त्याला भरुन काढायची जबाबदारी त्याच्यावर आहे. पण, संपूर्ण हंगामात त्याने चांगली कामगिरी करुन धोनीची उणीव जाणवणार नाही याची काळजी घेतली आहे. रवींद्र जडेजाने आपली अष्टपैलू खेळाडू म्हणून छाप आणखी पक्की केली आहे. या खेळपट्टीवर ९ बळी घेणे कठीण कामगिरी आहे. परंतु, गोलंदाजीतील सातत्य त्याने दाखवून दिले आहे. त्याचे क्षेत्ररक्षणही दर्जेदार होत असते, फलंदाजीत तो परिस्थितीनुसार गिअरअप करतो. त्याचे चौथ्या दिवसाचे जलद अर्धशतक भारतासाठी महत्त्वपूर्ण होते. तो अष्टपैलू म्हणून प्रगल्भ होत आहे, हे मात्र निश्चित. रविचंद्रन आश्विनला या मालिकेत जास्त बळी मिळवता आले नसले तरी गेल्या दोन हंगामात त्याने केलेली कामगिरी विसरुन चालणार नाही. त्याला लगेच दोषी ठरवून चालणार नाही, पुढे धरमशालामध्ये काय होतंय ते पाहुया.