शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मेस्सीचे धडाक्यात पुनरागमन

By admin | Updated: September 3, 2016 00:41 IST

निवृत्तीचा निर्णय फिरविल्यानंतर मैदानावर धडाकेबाज पुनरागमन करणाऱ्या लियोनेल मेस्सी याने निर्णायक गोल नोंदवून २०१८ च्या विश्वचषक पात्रता सामन्यात अर्जेंटिनाला

मेंडोज : निवृत्तीचा निर्णय फिरविल्यानंतर मैदानावर धडाकेबाज पुनरागमन करणाऱ्या लियोनेल मेस्सी याने निर्णायक गोल नोंदवून २०१८ च्या विश्वचषक पात्रता सामन्यात अर्जेंटिनाला पारंपरिक प्रतिस्पर्धी ऊरुग्वेवर १-० असे विजयी केले. रशियात होणाऱ्या फुटबॉलच्या विश्वचषकासाठी पात्रता सामन्यात विजय मिळविल्याने अर्जेंटिना द. अमेरिका गटात अव्वल स्थानी आला आहे. मेस्सीने आपल्या अंदाजात विक्रमी ५६ वा गोल नोंदवित संघाला विजय मिळवून दिला. मध्यांतराच्या दोन मिंिनटेआधी मेस्सीने ४३ व्या मिनिटाला गोल केला. चेंडू ऊरुग्वेचा बाचवफळीतील खेळाडू मारिया गिमेनेजला लागून गोलकिपर फर्नांडो मुसलेरा याला चकवित गोलजाळीत गेला. संघाच्या विजयात हाच गोल निर्णायक ठरला. अर्जेंटिनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ३१ व्या मिनिटाला उत्कृष्ट शॉटवर गोल नोंदविण्याचा प्रयत्न करणारा युवा फॉरवर्ड पावलो दाएबाला याला हाफटाईमआधीच दुसरे येलो कार्ड मिळाल्याने तो मैदानाबाहेर गेला. यानंतर संघ उत्तरार्धात दहा खेळाडूंसह खेळत राहिला. पूर्वार्धात बाचावात्मक खेळणाऱ्या उरुग्वेने मेस्सीच्या गोलनंतर आक्रमक धोरण अवलंबले. त्यांचा स्टार लुईस सुवारेजचे उत्कृष्ट प्रयत्न अर्जेंटिनाचा झेव्हियरने थोपवले.स्टायलिश विनिंग कमबॅकनिवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पुनरागमन केलेल्या स्टार लिओनेल मेस्सी याने या सामन्यादरम्यान आपल्या हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ब्लॉन्ड हेअर आणि वाढवलेली दाढी यामुळे मेस्सीच्या या लूकची बरीच चर्चा झाली. लिओनेल मेस्सीचे हे नवे ‘गोल्डन लूक’ संघासाठी देखील खऱ्या अर्थाने गोल्डन ठरले. सामन्यातील एकमेव गोल नोंदवताना मेस्सीने आपल्या जादुई खेळाच्या जोरावर पारंपारिक प्रतिस्पर्धी उरुग्वेला नमवले. (वृत्तसंस्था)विजयी संघाच्या बचावफळीने देखील सामन्यादरम्यान उत्कृष्ट कामगिरी बजावली. दहा देशांच्या द. अमेरिका गटात अर्जेंटिना सात विजयांसह १४ गुण घेत आघाडीवर आहे. उरुग्वे, कोलंबिया व इक्वाडोर यांचे प्रत्येकी १३ गुण आहेत. कोलंबियाने व्हेनेझुएलाचा २-० ने पराभव केला. ब्राझीलने इक्वाडोरचा ३-० ने पराभव करीत १२ गुणांसह पाचव्या स्थानावर झेप घेतली.