ब्यूनस आयर्स : बार्सिलोनाचा स्टार स्ट्रायकर लियोनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून तडकाफडकी जाहीर केलेली निवृत्ती आणि नंतर निवृत्तीचा निर्णय फिरविणे, हे सर्व नाटक होते, या शब्दात अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना याने मेस्सीवर टीका केली.मॅरेडोना म्हणाला, ‘हा पूर्वनियोजित कट होता, असा सर्व प्रकार वाटतो. हा कट कुठे शिजला माहिती नाही, पण आम्ही इतक्या मोठ्या फरकाने हरलो नाही, हे देखील सत्य आहे.’ मेस्सीने कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चिलीकडून पराभूत होताच आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केले होते. निवृत्ती मागे घेण्याच्यावेळी मेस्सी म्हणाला, ‘जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना माझ्या निर्णयामुळे आनंद होणार असेल तर मी पुन्हा मैदानावर येणार आहे.’अजोंटिना संघ १ सप्टेंबर रोजी उरुग्वेविरुद्ध विश्वचषकाचा पात्रता सामना खेळणार असून, मेस्सी या सामन्याद्वारे पुनरागमन करेल. (वृत्तसंस्था)फायनल खेळताना अनेक प्रकारचे विचार डोक्यात आले. मी खरोखर निवृत्ती जाहीर करण्याच्या विचारात होतो. मी माझ्या देशावर प्रेम करतो. निवृत्ती म्हणजे आत्महत्या, असे लक्षात येताच राष्ट्रीय संघात परतण्याचा निर्णय पुन्हा घेतला. पराभवासाठी कुणी मेस्सीला जबाबदार धरले नव्हते. पण, घाईघाईत त्याने जे पाऊल उचलले हे आश्चर्यकारक होते.- मॅरेडोना
मेस्सीची निवृत्ती ही ‘नौटंकी’ : मॅरेडोना
By admin | Updated: August 28, 2016 05:20 IST